शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक नाही देशात तीन "जीएसटी"

By admin | Updated: July 5, 2017 09:25 IST

देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर 1 जुलैपासून लागू झाला आहे. पण संपूर्ण देशात एक नाही तर 3 जीएसटी जन्माला आले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर 1 जुलैपासून लागू झाला आहे. पण संपूर्ण देशात एक नाही तर एकूण 3 जीएसटी जन्माला आले आहेत. तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे ? हो हे शक्य आहे.  तीन जीएसटीमध्ये एक प्रत्यक्ष कररचना आहे तर, उर्वरित दोन नवजात अर्भक आहेत. 
 
छत्तीसगडमधील गोंडस "जीएसटी" 
छत्तीसगडमधील कोरिया येथे 1 जुलैला एक मुलीचा जन्म झाला,  आईवडिलांनी तिचे नाव जीएसटी ठेवले आहे. जगदीश प्रसाद आणि सरोजनी असे या दाम्पत्याचे नाव आहे. एक जुलैपासून संपूर्ण देशभरात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाला. याच दिवशी सकाळी सरोजनीनं एका मुलीला जन्म दिला.  या पार्श्वभूमीवर आईवडिलांनी तिचे नाव जीएसटी असे ठेवले. 
 
जगदीश व सरोजनीची "जीएसटी"
(ऐतिहासिक! आजपासून जीएसटी पर्व सुरू)
जयपूरमध्ये "जीएसटी" जन्मली
शुक्रवारी (30 जून ) मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी मध्यरात्री (30 जून) 12.02 वाजता राजस्थानमधील ब्यावर  येथे एका गोंडस मुलीचा जन्म झाला. जीएसटीच्या मुहूर्ताला या मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांनी  आपल्या चिमुकलीचं नाव  "जीएसटी" ठेवले आहे.  
 
या मुलीचा जन्म शुक्रवारी मध्यरात्री (30 जून) 12.02 वाजता राजस्थानमधील ब्यावर  येथे झाला. यावेळी मुलीच्या आईनं आपल्या मुलासोबत एक सेल्फी काढला. या फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 
देशभरात लागू जीएसटी कर प्रणाली 
1 जुलैपासून देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्या बरोबरीनेच मध्यरात्रीच्या ठोक्याला संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याद्वारे जीएसटी अर्थात गुड्स अ‍ॅड सर्व्हिस टॅक्स ही नवी कररचना देशभरात लागू झाली.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जीएसटी केवळ आर्थिक सुधारणा नसून सामाजिक सुधारणेचे प्रतीक आहे. यातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न केंद्र आणि राज्य मिळून साकार करणार आहेत.
 
जीएसटीचा अर्थ काय हे सांगताना त्यांनी गुड अँड सिम्पल टॅक्स असा नवा फुलफॉर्म पेश केला. भ्रष्टाचाराला आळा घालणारी जीएसटी हे कोणत्याही एका पक्षाचे वा, एका नेत्याचे नव्हे, तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे, असंही मोदी यांनी स्पष्ट केले.