शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात नव्हे, झूठी बात!

By admin | Updated: December 1, 2014 23:49 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसची धोरणे आणि कामगिरीबद्दल दिशाभूल करणारी गरळ ओकणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भाजपाने सहा महिन्यांत किती आश्वासनांवर कसे घूमजाव केले

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसची धोरणे आणि कामगिरीबद्दल दिशाभूल करणारी गरळ ओकणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भाजपाने सहा महिन्यांत किती आश्वासनांवर कसे घूमजाव केले आहे, याची यादीच देशातील जनतेला देताना काँग्रेसने सोशल मीडियाचे शस्त्रही प्रभावीपणे वापरले आहे. काळा पैसाभाजपाने विरोधी पक्षात असताना काळ्या पैशावरून संपुआ सरकारवर हल्लाबोल केला. देशभरात आंदोलनही झाले. १७ एप्रिल २०१४ रोजी राजनाथसिंग यांनी, भाजपाचे सरकार आले तर शंभर दिवसांच्या आत विदेशात जमा असलेला काळा पैसा भारतात परत आणू, असे वचन देशाला दिले होते. तर विदेशातील काळा पैसा परत आणून भारतातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, अशी गर्जना नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार सभांमध्ये केली होती.काँग्रेसने हा आरोप करताना यू ट्यूबची लिंकही जारी केली, जेणेकरून लोकांना मोदींनी दिलेले ते आश्वासन प्रत्यक्ष बघता येऊ शकेल. आता तेच मोदी विदेशात नेमका किती काळा पैसा जमा आहे, हे आपल्याला ठाऊक नाही, असे रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगतात.विदेशात जमा असलेला काळा पैसा हुडकून काढण्यासाठी मनी लाँडरिंग कायद्याचा वापर का केला जात नाही, असा सवाल मोदी यांनी १ फेब्रुवारी २०११ रोजी तत्कालीन संपुआ सरकारला केला होता. मोदी आता सत्तेत आहेत. त्यांना कोण रोखत आहे? काळा पैसा परत आणण्यासाठी कायकाय केले हे त्यांनी सांगितले पाहिजे, अशी मागणी या पुस्तिकेत केली आहे. काँग्रेस सरकार खातेधारकांची नावे सर्वोच्च न्यायालयाला सांगू शकते पण जनतेला का नाही, असा सवाल करून रविशंकर प्रसाद यांनी १८ जानेवारी २०११ रोजी डबल टॅक्सेशनला ‘काँग्रेसने दिलेला टाकावू तर्क’ असे संबोधले होते. तो तर्क टाकावू होता तर मग मोदी सरकार आज तोच तर्क का देत आहे? वस्तुस्थिती ही आहे की, सत्ता प्राप्त करण्यासाठी मोदींसह भाजपा नेते दिशाभूल करण्याच्या हेतूने खोटे बोलत आले आहेत.नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांनीही निवडणूककाळात अशाचप्रकारचा तर्क दिला होता. १७ आॅक्टोबर २०१४ रोजी मोदी सरकारने घूमजाव केले. काळा पैसा असलेल्या खातेधारकांची नावे जाहीर केली जाऊ शकत नाही. कारण त्यामुळे कराराचा भंग होईल, असे मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. मोदी सरकार सहा महिन्यात काळ्या पैशाचा एक पैदेखील परत आणू शकले आणि एकाही नव्या खातेधारकाचे नाव जाहीर करू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. न्यायालयाला जी नाही देण्यात आली, ती संपुआ सरकारने आधीच शोधून काढली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)