शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान नव्हे चीन भारताचा मोठा शत्रू - मुलायम सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 14:36 IST

डोकलाम प्रकरणामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 -  डोकलाम प्रकरणामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत चीनसोबतच्या तणावाचा प्रश्न आक्रमकतेने मांडला. भारताचा सर्वात मोठा शत्रू हा पाकिस्तान नसून चीन आहे, हे मुलायम सिंह यांनी  ठळकपणे लोकसभेसमोर मांडले. 
चीनच्या कुरापतींबाबत मुलायम सिंह यादव म्हणाले, "चीन सिक्किम आणि भूतानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या देशाने भारतावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली आहे." यावेळी तिबेटबाबत बोटचेपी भूमिका घेण्याच्या तत्कालीन सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. कोणत्याही परिस्थिती तिबेट चीनच्या ताब्यात देता कामा नये होते. तीबेच चीनच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली गेली. आता भारताने तिबेटच्या स्वातंत्र्याचे आक्रमकपणे समर्थन केले पाहिजे. तसेच त्यासाठी दलाई लामा यांची सर्वतोपरी मदतही केली पाहिजे."अधिक वाचा
( धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा! चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्यांना इशारा )(भारत बनू शकतो मोठी महासत्ता, चीनी प्रसारमाध्यमांचे भाकीत )(चीन, पाकिस्तानसोबत लढण्यासाठी लागतील तब्बल 27 लाख कोटी : लष्कर )आता चीन पाकिस्तानला मदत करत आहे. तसेच तिबेटच्या सीमेवर युद्धसराव करण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. चीनने सीमेवर सुरू केलेल्या कारवाया पाहता भूतान आणि सिक्कीमचे संरक्षण करणे ही भारताची जबाबदारी असल्याचेही मुलायम यांनी सांगितले.  
दरम्यान, काश्मीरमधील अशांततेस पाकिस्तानबरोबरच चीनही कारणीभूत आहे, असा आरोप काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नुकताच केला होता. मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर  पत्रकारांशी बोलताना त्यांनी चीनही काश्मीरमध्ये गडबड करीत असल्याचे सांगितले.