शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संतांचा व्यवहारवाद न पटल्याने ते देव्हाऱ्यात

By admin | Updated: April 4, 2015 23:28 IST

संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला.

प्रतिनिधी- घुमान (संत नामदेवनगरी) संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे बंडखोर होते. ईश्वराचे लोकशाहीकरण करण्यासाठीच त्यांनी ‘संत साहित्य’ लिहिले. मात्र, संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला. संमेलनात ‘संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारात का नाही?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रा. ललित अधाने, बाळ कुळकर्णी आणि डॉ. संजयकुमार करंदीकर सहभागी झाले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. ४अधाने म्हणाले, संत साहित्य देव्हाऱ्यातच आहे, असे मुळीच नाही. केवळ त्याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून आजवर पाहिले गेलेले नाही. संत साहित्याची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये उपनिषदात्मक साहित्य शिकविले गेले पाहिजे. विद्यापीठांमध्ये संत साहित्याचे तत्त्वज्ञान या विषयाचा समावेश झाला पाहिजे. बाळ कुळकर्णी यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांतून सोदाहरण साहित्य आणि व्यवहारवाद याची व्याख्या विषद केली. ते म्हणाले, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे बंडखोर कवी होते. त्यांनी ईश्वराचे लोकशाहीकरण केले. मात्र, संतांनी जो व्यवहारवाद सांगितला तो सोयीचा न वाटल्यामुळे त्यांना देव्हाऱ्यात बसविण्यात आले. संत साहित्याचा गाभा स्वार्थी बुद्धिवंतांनी लपवून ठेवला. ४करंदीकर म्हणाले, संत साहित्य सामाजिक चळवळ होऊ शकली नाही. त्यातील उच्चतम मूल्यांचा विचार आत्मसात न केल्यामुळेच ते व्यवहारात येऊ शकलेले नाही. संतांचे विचार पुढे नेण्याची जवाबदारी अनुयायांची आहे. अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले, सामान्य माणसाला देव्हारा कळतो. जे मिळते ते घेणे याला उच्चतम व्यवहार म्हणतात. संत साहित्य हे देव्हाऱ्यात राहू नये असे वाटत असले तर त्याचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे.