मेरठ : ‘आॅनर किलिंग’च्या घटनेमुळे उत्तर प्रदेश पुन्हा हादरले आहे. बहिणीचे शेजारच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने भावाने सुऱ्याने गळा चिरून तिची हत्या केली. मेरठ जिल्ह्यातील शोभापूर गावात ही घटना घडली. भयंकर म्हणजे माथेफिरू भावाने आईवडिलांच्या डोळ्यासमोर हे कृत्य केले. कातडीचा व्यापार करणाऱ्या बाबूलाल यांची मुलगी भारती काल सकाळी प्रियकरासोबत पळून गेली होती. तिला पकडून आणल्यानंतर मोठा भाऊ अमितने तिची हत्या केली.
उत्तर प्रदेशात आॅनर किलिंग; पळून गेलेल्या बहिणीची हत्या
By admin | Updated: February 8, 2015 02:31 IST