शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

उत्तर भारताला वादळाचा तडाखा, 109 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:16 IST

उत्तर भारतात जोरदार पाऊस, धुळीचे वादळ व जोरदार वारा यामुळे बुधवारी रात्री १०९ जणांचा बळी गेला असून, शेकडो लोक जखमी झाले

नवी दिल्ली : उत्तर भारतात जोरदार पाऊस, धुळीचे वादळ व जोरदार वारा यामुळे बुधवारी रात्री १०९ जणांचा बळी गेला असून, शेकडो लोक जखमी झाले. वादळी वारे व पावसाचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश आणि राजस्थानला बसला आहे. उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडली आहेत व वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांमध्ये तातडीने मदत व पुनर्वसनाचे काम सुरू करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. धुळीच्या वादळाचा सर्वांत जास्त तडाखा उत्तर प्रदेशला बसला. चार जिल्ह्यांत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. या चार जिल्ह्यांत तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्यात सर्वाधिक ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.ताशी १०० किमीहून जास्त इतक्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाºयाच्या साथीने या धुळीच्या वादळाने बुधवारी सकाळी ७ वाजता राजस्थानला तडाखा दिला. वादळात धौलपूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. तिथे १७ जण मरण पावले आहेत. त्यापैकी बहुतांश लोकांचा मृत्यू वादळामुळे घरे कोसळल्याने त्याखाली दबून झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्यांबद्दल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.उत्तराखंड, मध्य प्रदेशलाही घेरलेउत्तराखंड राज्यामध्ये बुधवारी पहाटे धुळीच्या वादळाबरोबरच जोरदार पाऊसही पडला. या दुहेरी माºयामुळे तेथील कुमाऊ भागात दोन ठार व काही जण जखमी झाले आहेत.या आपत्तीमुळे चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या यात्रेत अडथळे निर्माण झाले आहेत. चामोलीतील नारायण बागर येथे ढगफुटी झाल्याचेही म्हटले जात असून स्थानिक प्रशासनाने मात्र त्याचा इन्कार केला आहे.उत्तराखंडमधील चामोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, पिठोरगढ या जिल्ह्यांमध्ये येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील कल्याणपूर गावात चार वर्षांचा एक मुलगा व सतना येथील उचेरा येथे एका व्यक्तीचा वादळामुळे मृत्यू झाला आहे.योगींना काँग्रेसचा चिमटाधुळीच्या वादळाचा तडाखा बसून उत्तर प्रदेशात भलेही अनेक लोक मरण पावले असतील पण मी मात्र कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातील खेळींमध्येच गुंतलो आहे, असा चिमटा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काँग्रेसचे नेते रणदीप सुर्जेवाला यांनी टिष्ट्वट करून बुधवारी काढला. आदित्यनाथ सध्या कर्नाटकच्या प्रचारदौºयावर आहेत.राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, ६० टक्के जखमी असलेल्या लोकांना २ लाख रुपये मदत दिली जाणार आहे. ४०-५० टक्के जखमी असणाºयांना ६० हजार रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत.अंदाज पूर्वेकडचा, फटका उत्तरेला!मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्व भारत आणि उत्तर-पूर्व भारतात वादळाचा तडाखा बसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र राजस्थानसह उत्तर भारतात कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा इशारा दिला गेला नव्हता. या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन वादळ येईल, पाऊस पडेल किंवा धुळीचे वादळ निर्माण होईल असा कोणताही इशारा दिला नव्हता. याचा अर्थ मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेण्यात हवामान खात्याला अपयश आले आहे. स्कायमेट या खासगी संस्थेने राजस्थानात १ मे रोजी धुळीचे वादळ येण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते.