नवी दिल्ली : ईशान्यकडील राज्यांसाठी स्वतंत्र टाइम झोनची मागणी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली आहे. कार्यक्षमता आणि कामाचे तास वाढवण्यासाठी आम्हाला स्वतंत्र टाईम झोन मिळावा, असे पेमा खांडू यांनी म्हटले आहे. ईशान्य भारतातील कार्यक्षमता वाढवणे आणि विजेची बचत करण्यासाठी स्वतंत्र टाइम झोन असणे गरजेचे झाले आहे, असे खांडू म्हणाले. त्यांनी सांगितले की, आम्ही पहाटे लवकरात लवकर म्हणजे चार वाजता उठतो, कारण त्यावेळी आमच्याकडे उजाडलेले असते. पण त्यानंतर तब्बल सहा तासांनी म्हणजे सकाळी १0 वाजता सरकारी कार्यालये सुरू होतात आणि आमच्याकडे लवकर अंधार होत असल्याचे ती दुपारी चार वाजताच बंद होतात. त्यामुळे दिवसा उजेडाचे कित्येक तास वाया जातात. संपूर्ण ईशान्य भारतासाठी स्वतंत्र टाइम् ाझोन असावा अशी मागणी करणारी सार्वजनिक हिताची याचिका गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर खांडू यांनी ही मागणी केली आहे. जानेवारी २०१४ मध्ये आसामाचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीदेखील ईशान्य भारतात वेगवेगळे टाइम झोन असावेत व चहाच्या मळ््याचा वेळ (चाय बागान) त्या भागात पाळला जावा, असे सुचवले होते. चहाच्या मळ््याचा वेळ ही चहाच्या मळ््यांमध्ये वापरण्याची नेहमीची पद्धत असून ती भारतीय प्रमाण वेळेपेक्षा तासभर पुढची आहे. अनेक देशांमध्ये एकाहून अधिक टाइम झोन आहेत. अमेरिकेमध्ये ५0 राज्ये असून, तिथे ९ टाइम झोन आहेत. (वृत्तसंस्था)कार्यक्षमता वाढू शकेलबंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्सड् स्टडीजने आपल्या अहवालात टाइम झोन बदलल्यास विजेचे २.७ अब्ज युनिट्स वाचतील असा दावा केला आहे. नियोजन आयोगानेही २००६ च्या अहवालात कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारतात वेगवेगळ््या टाइम झोनची शिफारस केली आहे.
ईशान्येच्या राज्यांना हवा स्वतंत्र टाइम झोन
By admin | Updated: June 13, 2017 01:50 IST