नूर मोहम्मदचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST
- अपराधीपणाच्या भावनेतून कृत्य
नूर मोहम्मदचा आत्महत्येचा प्रयत्न
- अपराधीपणाच्या भावनेतून कृत्यमुंबई : इसिसच्या वाटेवरून माघारी परतलेला मालवणी परिसरातील नूर मोहम्मद याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला शनिवारी इस्पितळातून सुटी देण्यात येणार आहे. इसिसच्या प्रभावाखाली आल्याबद्दल मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे मी कुटुंबापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.चार दिवसांपूर्वी त्याने विष प्राशन केले होते. त्याला पोलिसांनीच शताब्दी इस्पितळात दाखल केले. इसिसचा मार्ग पत्करून कुटुंबाची बदनामी केल्याने मला अपराध्यासारखे वाटत होते. इसिसची वाट धरावी की, कुटुंबासोबत रहावे, अशा द्विधा स्थितीत मी अडकलो होतो. मनात अपराधीपणाची भावना होती. त्यामुळे मी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला असे त्याने जबाबात म्हटले आहे, असे एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.गेल्या वर्षी इसिसच्या वाटेवर असलेले मालवणीचे चार तरुण बेपत्ता झाले होते. अयाज सुल्तान हा काबूलला जाऊन इस्लामकि स्टेटमध्ये सामील झाला. मोहसीन शेख अद्यापही बेपत्ता आहे. वाजिद शेखला एटीएसने पुणे येथून ताब्यात घेतले, तर मीडियात फोटो आल्यानंतर नूर स्वत:हून मुंबईला परतला होता.