शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिकेच्या लिफाफ्यावर सीलसोबत नॉन टेंपरिंग चिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:17 IST

प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर सीबीएसईच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे बोर्ड प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी नव्या सुरक्षा उपायांवर विचार करण्यात येत आहे

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर सीबीएसईच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे बोर्ड प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी नव्या सुरक्षा उपायांवर विचार करण्यात येत आहे. यानुसार, ज्या लिफाफ्यात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठविली जाते त्या लिफाफ्यावर नॉन टेंपरिंग चिप लावण्याबाबत बोर्ड अधिकाऱ्यात विचार होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चिपचा फायदा असा होणार आहे की, जेथे हा लिफाफा जाईल तेव्हा त्याच्या सद्यस्थितीची माहिती मिळेल आणि जेव्हा हा लिफाफा उघडण्यात येईल तेव्हा चिपच्या टेंपर होण्याची म्हणजे लिफाफा उघडला गेल्याची सूचना थेट परीक्षा शाखेच्या मुख्य सर्व्हर रुममध्ये पोहचेल.एका अधिकाºयाने सांगितले की, या तंत्राचा अवलंब करण्याचे संकेत मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी अलीकडेच सांगितले होते की, आता तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रश्नपत्रिका लीक होण्याचे प्रकार रोखले जाऊ शकतात.अर्थात, या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यापूर्वी याचे परीक्षण केले जाईल. याशिवाय सी- डॅक अथवा अन्य तांत्रिक संस्थेकडून याची तांत्रिक पडताळणी केली जाईल.'असा आहे नियम...सुरक्षेच्या कारणास्तव प्रश्नपत्रिका बँक लॉकरमध्ये ठेवल्या जातात. ज्या शाळेला परीक्षा केंद्र बनविले जाते त्यांना हे सांगितले जाते की, कोणत्या बँकेत जाऊन प्रश्नपत्रिका घ्यायच्या आहेत. परीक्षेच्या दिवशी एखाद्या शिक्षकाला सकाळी ८.३० वाजता बँकेत पाठविले जाते. तो प्रश्नपत्रिका लिफाफ्यातून कोणत्याही परिस्थितीत स. ९.३० पर्यंत परीक्षा केंद्रावर पोहचवितो.