नवी दिल्ली : देशातील डेअ:यांमध्ये उपलब्ध नोक:यांमध्ये सुमारे 19 टक्के वाटा मिळवून महाराष्ट्राने अव्वल क्रमांक राखला आहे. त्याचबरोबर डेअरी उत्पादनातही हे राज्य दुस:या क्रमांकावर आले आहे.
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम) ने केलेल्या एका अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. महाराष्ट्रात 1493 डेअ:या असून, त्यामध्ये देशातील एकूण डेअरी उत्पादनापैकी 16 टक्के उत्पादन होत आहे. 17 टक्के उत्पादन असणा:या गुजरात राज्य डेअरी उत्पादनात अव्वल स्थानी
आहे.
देशात होणा:या दुग्धोत्पादनात मात्र महाराष्ट्राचा क्रमांक बराच खाली घसरलेला आहे. देशात 12क् दशलक्ष टनांचे दुग्धोत्पादन होते त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा अवघा 7 टक्के आहे. त्यामुळे दुग्धोत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक सहावा आहे. दरडोई दुधाच्या उपलब्धतेत महाराष्ट्र राज्य 14 व्या क्रमांकावर आहे.
दरडोई दुधाचे उत्पादनात राज्यात 9 टक्के वाढ झाली आहे. अखिल भारतीय स्तरावर वाढीचा हा दर 12 टक्के आहे.
देशातील दुग्धोत्पादनात 2क्क्6 ते 1क् या कालावधीत सुमारे 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2क्1क्-11 मध्ये देशातील दुग्धोत्पादन 121 मेट्रीक टनांवर पोहोचले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश असला तरी दरडोई दुधाची उपलब्धता मात्र जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याची माहिती असोचेमचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले. जगातील दुधाचे दरडोई सरासरी प्रमाण 279 ग्रॅम एवढे आहे. भारतात मात्र ते 252 ग्रॅम एवढेच आहे.
महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायाला पूरक वातावरण आहे. शेतीसाठी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. सहकारी दूध डेअ:यांची संख्याही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4दुग्धोत्पादन आणि दरडोई दुधाची उपलब्धता यामध्ये होणा:या वाढीमध्ये आंध्रप्रदेश अव्वल स्थानी आहे. येथील वाढीचा दर अनुक्रमे 41 आणि 36 टक्के एवढा असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
4राजस्थान (28 टक्के), केरळ (24.8 टक्के), कर्नाटक (24 टक्के) आणि गुजरात (23.7 टक्के) ही राज्ये दुग्धोत्पादनाच्या वाढीमध्ये अव्वल स्थानावर आहेत.