शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारताला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही - अनुपम खेर

By admin | Updated: November 7, 2015 12:41 IST

प्रत्येक देशाला कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, पण म्हणून कोणालाही आपल्या देशाला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार नाही, असे अभिनेता अनुपम खेर यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ -  प्रत्येक देशाला कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, पण म्हणून कोणालाही आपल्या देशाला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार नाही, असे अभिनेता अनुपम खेर यांनी स्पष्ट केले. देशातील असहिष्णू वातावरणाच्या विरोधात अनेक साहित्यिक, लेखक, दिग्दर्शकांनी चालवलेल्या 'पुरस्कार वापसी' मोहिमेचा तीव्र शब्दात निषेध करणारे अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या समर्थनार्थ आज राजधानी दिल्लीत  'मार्च फॉर इंडिया'चे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय संग्रहालयापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात दिग्दर्शक मुधर भांडरकर, तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसह सुमारे दोन हजार जण सहभागी झाले होते. शंखनाद करत  भारत माता की जय,  मार्च फॉर इंडिया, इंडिया इज टॉलरन्ट अशा घोषणांनी या मार्चला सुरूवात झाली. मात्र अशा घोषणा न देण्याचे आवाहन खेर यांनी उपस्थितांना केले. 
मोर्चाला सुरूवात करण्यापूर्व खेर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण सर्व धर्मनिरपेक्ष आहोत, आपला दांभिक निधर्मीपणावर विश्वास नाही. जे लोक पुरस्कार परत करत आहेत, त्यांना १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीत असहिष्णूता दिसली नव्हती का असा सवाल खेर यांनी विचारला. आपण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन देशात सहिष्णुता असल्याचे सांगणार असल्याचेही खेर म्हणाले. 
पुरस्कार वापसी ही राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याची जाहीर टीका करणारे अभिनेता अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचे घोषित केले होते. पुरस्कार वापसी ही भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करण्यासाठी केलेले षडयंत्र असल्याची टीका खेर यांनी केली होती.