शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरवर जीएसटी नकोच, काँग्रेसची मागणी

By admin | Updated: July 5, 2017 01:30 IST

घरगुुती सिलिंडरवर आकारण्यात आलेला ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : घरगुुती सिलिंडरवर आकारण्यात आलेला ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या निर्णयाने गरिबांना आर्थिक फटका बसणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी व्यक्त केले आहे. माकन म्हणाले की, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर घरगुती सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य आणि विशेषत: गरिबांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडरवरील जीएसटी त्वरित मागे घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. घरगुती गॅस सिलिंडरला ५ टक्क्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले. यापूर्वी काही राज्यांमध्ये सिलिंडरवर २ ते ४ टक्के व्हॅट आकारण्यात येत होता. माकन यांनी दावा केला की, विविध प्रकारची पेये, हेल्मेट, हेअर आॅइल, टूथपेस्ट, चहा, कॉफी, बटर, दही, सिमेंट आणि मिनरल वॉटर यांचे दर वाढले आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तूंचे दर कमी होतील, असा शब्द सरकारने दिला होता. तरीही या वस्तंूच्या दरात वाढ झाली आहे.ग्राहकांना लाभ नाहीअजय माकन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतरही सरकारने याचा लाभ देशातील नागरिकांपर्यंत पोहचवला नाही. इंधनाच्या दरात कपान न करता सरकार दर वर्षी तीन लाख कोटींचा नफा मिळवत आहे. एकीकडे नफा मिळविला जात आहे तर, दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरवर कर आकारला जात आहे. जीएसटीचा उल्लेख त्यांनी ‘गयी सेव्हिंग तुम्हारी’ असा केला. सहा वर्षांतील सर्वाधिक वाढ जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर  घरगुती सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांची वाढ झाली असून, ही सहा वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे. नवी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ४४६.६५ रुपयांवरून ४७७.४६ रुपये झाली आहे. यापूर्वी दिल्ली, चंदीगढ, हरियाणा, जम्मू-काश्मीर, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि काही ईशान्येच्या राज्यांत सिलिंडरवर १ ते ५ टक्के व्हॅट वा विक्री कर आकारण्यात येत होता. उर्वरित देशात शून्य टक्के कर होता. आता सबसिडी असलेल्या सिलिंडरवर हा कर ५ टक्के असेल. मुंबईमध्ये पूर्वी सिलिंडरवर ३ टक्के व्हॅट आकारण्यात येत होता. मुंबईत सिलिंडरच्या दरात १४.२८ रुपये वाढ होऊन सिलिंडरची किंमत ४९१.२५ रुपये झाली आहे. प्रत्येक कुटुंबाला दर वर्षी १४.२ किलोचे १२ सिलिंडर या दराने मिळतात. विनाअनुदानित सिलिंडरचे दर दिल्लीत ११.५ रुपयांनी वाढून ५६४ रुपये झाले आहेत.