शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांची मनपाकडे नाही आकडेवारी शासन आदेशाचीही प्रतीक्षा: वाढीव एफएसआयला परवानगी नाहीच

By admin | Updated: March 15, 2016 00:33 IST

जळगाव: राज्य शासनाने राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्याची घोषणा केली आहे. मात्र मनपाकडे अशी किती बांधकामे आहेत? याची अधिकृत आकडेवारीच उपलब्ध नाही. तसेच शासन आदेशाचीही अधिकार्‍यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान महाराष्ट्र नगररचना अधिनियमानुसारच ही बांधकामे अधिकृत केली जाणार असल्याने जादा एफएसआय वापरलेली बांधकामे नियमित होणार नाहीत, असे नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम यांनी स्पष्ट केले.

जळगाव: राज्य शासनाने राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्याची घोषणा केली आहे. मात्र मनपाकडे अशी किती बांधकामे आहेत? याची अधिकृत आकडेवारीच उपलब्ध नाही. तसेच शासन आदेशाचीही अधिकार्‍यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान महाराष्ट्र नगररचना अधिनियमानुसारच ही बांधकामे अधिकृत केली जाणार असल्याने जादा एफएसआय वापरलेली बांधकामे नियमित होणार नाहीत, असे नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम यांनी स्पष्ट केले.
मनपाने चारपाच वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे २ हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर भर पडली असल्याने अचूक आकडा आज उपलब्ध नाही. तसेच शासनाने केलेल्या घोषणेनुसार यापैकी किती बांधकामे अधिकृत होऊ शकतील? याचीही माहिती उपलब्ध नाही. तीन महिन्यांच्या आत संबंधीतांनी मनपाकडे अर्ज करणे आवश्यक असल्याने तसे अर्ज आल्यास ही बांधकामे नियमित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
नव्याने करावा लागणार सॅटेलाईट नकाशा
शासनाने अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्यासाठी सॅटेलाईट नकाशाचा वापर करण्याची सूचना केली आहे. मनपाकडे मात्र हा नकाशाच उपलब्ध नाही. मनपाने दोन-तीन वर्षांपूर्वी स्पेक कंपनीला या कामाचा ठेका दिला होता. मात्र मक्तेदाराने काम अर्धवट सोडून पळ काढला. त्यामुळे मनपाचा या कामावरील खर्च झालेला निधी वाया गेला. आता अर्थसंकल्पात नव्याने मक्ता देण्यासाठीच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार अर्थसंकल्प मंजूर होताच मक्ता दिला जाणार आहे.