शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अणुदुर्घटनाग्रस्तांना दाव्याचा नाही हक्क

By admin | Updated: February 9, 2015 00:28 IST

अणुभट्ट्या चालविणा-या कंपन्यांना विदेशी पुरवठादार कंपन्यांवर नुकसानभरपाईसाठी दावा करण्याचा अधिकार असेल.

नवी दिल्ली : भारतात आण्विक दुर्घटना झाल्यास पीडितांना नुकसानभरपाईसाठी थेट दावा करता येणार नाही. मात्र, अणुभट्ट्या चालविणा-या कंपन्यांना विदेशी पुरवठादार कंपन्यांवर नुकसानभरपाईसाठी दावा करण्याचा अधिकार असेल.अमेरिकेसोबत झालेल्या सामंजस्य कराराची विस्तृत माहिती सरकारने रविवारी जारी केली. नागरी उत्तरदायित्व, नुकसानभरपाई आणि खटल्याच्या मुद्यावर विदेश मंत्रालयाने सात पानांचे विवरण जारी केले आहे. ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’ असे या विवरणाचे शीर्षक आहे.धोरणात्मक अडसर दूर करण्यासाठी भारत- अमेरिका अणुसंपर्क गटाच्या लंडनमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या आटोपल्या होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा २५ जानेवारी रोजी भारतभेटीवर आले त्या तीन दिवस आधी चर्चेतून गुंता सोडविण्यावर भर देण्यात आला होता. याच चर्चेच्या आधारावर भारत- अमेरिका सामंजस्याप्रत पोहोचले होते. २५ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबामा यांनी नागरी अणुसहकार्य कराराचा मार्ग प्रशस्त झाल्याची घोषणा केली होती. लंडनमधील चर्चेमुळे अणुसहकार्यासंबंधी दोन प्रलंबित मुद्यांवर सहमती शक्य झाली. देशाच्या अणुनुकसानीसंबंधी नागरी उत्तरदायित्व कायद्यानुसार (सीएलएनडी) सर्व कायदेशीर जबाबदारी परिचालन कंपन्यांकडे दिली जाते. स्वदेशी आणि विदेशी पुरवठादार कंपन्यांनी कलम ४६ च्या व्याप्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. अन्य कायद्यांनुसार खटल्याची कारवाई केली जाऊ शकत असल्याने हा मुद्दा महत्त्वाचा मानला जात होता. अणुअपघाताच्या स्थितीत नुकसानभरपाईसाठी अन्य कायद्यांचा वापर करताना कलम ४६ चा आधार घेतला जाऊ शकणार नाही, असेही विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.कायद्यात सुधारणा नाही उत्तरदायित्व, नुकसानभरपाई आणि कायदेशीर कारवाई या मुद्यांवर वारंवार प्रश्न विचारण्यात आला होता. नागरी अणुउत्तरदायित्व कायद्यात (सीएनएलडी) कोणतीही सुधारणा करण्याचा आमचा प्रस्ताव नाही, असे भारताच्या विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अपघात झाल्यास पीडितांना अणुभट्ट्यांना पुरवठा करणाऱ्या विदेशी पुरवठादारांवर खटला भरता येणार नाही. मात्र, आॅपरेटर्सना दाव्याचा अधिकार असेल. आॅपरेटर आणि पुरवठादार यांच्यातील करारानुसार या अणुभट्ट्यांचे संचालन चालेल, असे सूत्रांनी नमूद केले. विदेश मंत्रालयाने अणुकराराप्रत कसे पोहोचलो याचे विस्तृत विवरण देताना सर्वसामान्य शंकांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने उत्तरदायित्व कायदा २०१० तसेच त्यासंबंधी नियमावली २०११ मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्याचा प्रस्ताव नसल्याचेही स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)