शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैशावर मोदींसारखी कारवाई कोणीच केली नाही- जेटली

By admin | Updated: January 8, 2017 16:53 IST

मोदी सरकारनं हे सर्व करून दाखवलं आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारनं देशाच्या सुरक्षेसाठी नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती, मात्र मोदी सरकारनं हे सर्व करून दाखवलं आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. पंजाबमधल्या अमृतसर येथील विजय संकल्प यात्रा रॅलीमध्ये ते बोलत होते. केंद्र सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. काँग्रेसनं पंजाबमध्ये 2002-07दरम्यान स्वतःचे सरकार असताना राज्यासाठी कोणतंही काम केलं नाही. काँग्रेसवाले फक्त आरोप-प्रत्यारोप आणि बदल्यांचं राजकारण करत आले आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार असताना शिक्षणासह कोणत्याही क्षेत्रात काँग्रेसनं चांगली कामगिरी केली नाही. मात्र अकाली दल-भाजपा सरकारनं गेल्या 10 वर्षांत राज्याचा अभूतपूर्व असा विकास केला आहे. राज्यात हल्लीच केंद्रीय शैक्षणिक संघटनांनी शिक्षणासाठी चांगला प्रचार केला आहे. अकाली दल आणि भाजपा आता तिस-यांदा पंजाबमध्ये सत्तेवर येईल, असंही जेटली म्हणाले आहेत. (नोटा बंदीमुळे ८६ टक्के चलन बदलणार - अरुण जेटली)(500 रुपयांच्या जास्त नोटा वितरणात येणार - अरुण जेटली)

दरम्यान, जेटलींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींच्या कार्यकाळात देश प्रामाणिक, स्वच्छ आणि प्रगतिपथावर असल्याचं म्हटलं आहे. पंजाबमध्ये भाजपाची ही यात्रा 29 डिसेंबर 2016पासून प्रदेशाध्यक्ष विजय सांपला यांच्या नेतृत्वात सुरू झाली असून, पंजाब निवडणुकीत विजय मिळवण्याच्या उद्देशानं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाला बहुमत असलेल्या 23 ठिकाणांहून ही यात्रा काढण्यात आली आहे.