शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चोख बंदोबस्तात ‘नीट’-१ सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2016 02:29 IST

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश दिल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच १ मे रोजी पहिल्या टप्प्याची

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश दिल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा पार पडली. सीबीएसईने परीक्षार्थींना घालून दिलेली वेशसंहिता आणि अन्य निर्बंधानुसार ही परीक्षा घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.४२ शहरांतील १,०४० केंद्रांवर ६.६७ लाख परीक्षार्थींनी ही परिक्षा दिली. गेल्या वर्षी हिच परीक्षा प्री मेडिकल एन्ट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ व गैरप्रकार झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षार्थींना टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे यासह परीक्षाकेंद्रात जाण्यास मनाई होती. पेन-पेन्सिलही आत नेऊ दिली गेली नाही. ज्यांनी अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यात ही परीक्षा देता येईल. दरम्यान सीबीएसईने १ मे रोजी विद्यार्थ्यांनी दिलेला पेपर आॅनलाईन केला आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चा कोड टाकून अ‍ॅन्सर की आणि सोडविलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येईल. या परीक्षेचे कटआॅफ गुण सीबीएसई एआयपीएमटी साईटच्या मुख्य पोर्टलवर घोषित केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)राज्य सरकार आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारकडून घेतली जाणारी एमएचसीईटी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा ५ मे रोजी होणार असल्यामुळे राज्य सरकारने ‘नीट’ या वर्षी घेण्याला विरोध चालविला असून, आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. १२ जण परीक्षेस मुकलेनवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये ‘नीट’ परीक्षेसाठी गेलेल्या १२ विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्याच्या कारणास्तव परीक्षेला मुकावे लागले. मात्र शाळा प्रशासनाने परीक्षा सुरू होण्याच्या तीन मिनिटांआधीच गेट बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेला मुकलेल्या या मुलांना पुढील दुसऱ्या सत्रात होणाऱ्या २४ जुलैची संधीही मिळणे अशक्य होणार आहे.परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांत डहाणू तालुक्यातील पहाड गावची तेजल राऊत, श्रीवर्धन येथील निशिगंधा केळकर, बोरीवलीमधील निखिल मिश्रा, औरंगाबादचा वैभव फड, वांदे्र येथील मंथाशा यांचा समावेश होता. यासंदर्भात शाळा प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी अनेकवेळा संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.