शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार यांच्या महाआघाडीत फूट

By admin | Updated: August 15, 2015 01:42 IST

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत निवडणुका जाहीर होण्याआधीच बिघाडीची सुरुवात झाली आहे. केवळ तीन जागा मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने

पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत निवडणुका जाहीर होण्याआधीच बिघाडीची सुरुवात झाली आहे. केवळ तीन जागा मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी रोष व्यक्त केला असतानाच शुक्रवारी समाजवादी पार्टीने एकही जागा न मिळाल्याच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे सांगत सपाने विधानसभा निवडणुकीत ‘उचित वाटा’ मिळण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. राष्ट्रवादीने १२ जागा मागितल्या असताना केवळ तीन जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीने हा आपला अवमान असल्याचे म्हटले होते. संयुक्त जनता दल आणि राजदने प्रत्येकी १००, तर काँग्रेसने ४० जागा घेतल्या आहेत. या जागा वाटपात सपाला भोपळा मिळाला.लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांना एकत्र आणण्यात आणि महाआघाडी स्थापन करण्यात सपाने मोठी भूमिका बजावली; पण जागा वाटपाच्या वेळी सपाला पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले. जागा वाटप करताना आमच्याशी साधा संपर्कही साधला गेला नाही. या वागणुकीविरुद्ध आम्ही बेमुदत उपोषण आरंभ केले आहे, असे सपाचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र यादव यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)