शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

नितीश यांची आज परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:26 IST

भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार उद्या, शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करून ती परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होतीलही; पण यानिमित्ताने त्यांच्या संयुक्त जनता दलातील फुटीची पटकथाही तयार होताना दिसत आहे.

शीलेश शर्मा/एस.पी. सिन्हा नवी दिल्ली/पाटणा : भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार उद्या, शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करून ती परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होतीलही; पण यानिमित्ताने त्यांच्या संयुक्त जनता दलातील फुटीची पटकथाही तयार होताना दिसत आहे. पक्ष टिकविणे हीच खरी नितीश कुमार यांची परीक्षा असणार आहे. सहा वेळा मुख्यमंत्री होण्यासाठी, दरवेळी संगत बदलत जाण्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विश्वासार्हतेबद्दलच शंका व्यक्त केली आहे.नितीश सरकार टिकण्यासाठी संयुक्त जनता दलात फूट होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर जदयूच्या नाराज नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पक्ष टिकविण्यासाठी ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ अध्यक्ष व माजी अध्यक्ष शरद यादव यांना नितीशकुमार यांचा भाजपासमवेत जाण्याचा निर्णय अमान्य आहे. खा. अली अन्वर अन्सारी व खा. वीरेंद्र कुमार यांनीही नितीश कुमार यांच्या निर्णयाला उघडपणे विरोध दर्शविला आहे.आम्ही भाजपासोबत जाणार नाही, असे दोघा खासदारांनी जाहीर केले आहे. याखेरीज संयुक्त जनता दलाच्या बिहारमधील मुस्लीम आमदारांनाही भाजपाशी संगत करणे आवडलेले दिसत नाही.त्या पक्षाच्या केरळ शाखेनेही नितीश कुमार यांचा निर्णय आम्हाला अमान्य असल्याचे जाहीर केले आहे. या साºयाचा परिणाम बिहार सरकारवर होऊ नये, यासाठी भाजपातर्फेच जोरात प्रयत्न सुरू आहेत.नितीश कुमार यांनी भाजपासमवेत सरकार स्थापन करण्याचे ठरविल्यानंतर शरद यादव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी आणि शरद यादव यांच्यात चर्चा झाली. नितीशकुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीला तडा दिला असला तरी आम्ही विरोधकांसोबत राहू, असे यादव यांनी त्यांना सांगितले. नितीशकुमार यांच्या निर्णयाशी सहमत नसलेल्या खासदार, आमदार तसेच अन्य नेत्यांना आता एकत्र आणले जाणार आहे.शरद यादव यांनी आपल्या निवासस्थानी काही नेत्यांशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली आहे. तिथे अली अनवर अन्सारी, वीरेंद्र कुमार यांच्यासह पक्षाचे अन्य नेतेही हजर होते.विरोधी नेत्यांची टीकाकाँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी यांनीही नितीश कुमार यांच्या नव्या भूमिकेवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी तर नितीश कुमार यांच्यावर धोका दिल्याचा आरोप केला, तर सपाचे अखिलेश यादव यांनी आम्ही उगीचच तुमच्यासोबत राहिलो, असे बोलून दाखवले. मायावती यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे, त्या म्हणाल्या की, नागरिकांनी जो कौल दिला होता त्याविरुद्ध नितीशकुमार यांनी भूमिका घेतली आहे. भाजप आणि मोदी हे निवडणूक हरल्यानंतर तोडफोड करून सरकार स्थापन करत आहेत. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि बिहारमध्ये असे झाले आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे.संयुक्त जनता दलाची मते फुटणार?विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संयुक्त जनता दलाची मते फुटू शकतील, हे गृहीत धरून काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांना सोबत घेण्याचे प्रयत्न नितीश कुमार व भाजपा यांनी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात जदयूची मते उद्या फुटतात की नंतर पक्षातच फूट पडते, हे सांगणे अवघड आहे.काँग्रेसचा फुटीर भाजपातर्फे राज्यसभेवर?नवी दिल्ली : काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते शंकरसिंह वाघेला यांच्या तीन समर्थक आमदारांनी गुरुवारी पक्ष व आमदारकी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे प्रमुख प्रतोद बलवंतसिंह रजपूत यांचा त्यात समावेश असून, त्यांनी पक्ष सोडताच, ते भाजपातर्फे राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. येत्या ८ आॅगस्ट रोजी गुजरातमधून राज्यसभेवर तिघांना निवडून पाठवण्यात येणार असून, त्यासाठी भाजपाने याआधीच पक्षाध्यक्ष अमित शहा आणि माहिती व प्रसारणमंत्रीस्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. - सविस्तर वृत्त/१२