शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कटाराच्या मारेकऱ्यांच्या शिक्षेत वाढ फाशीची याचिका फेटाळली

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

नवी दिल्ली : बहुचर्चित नितीश कटारा हत्याकांड प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज शनिवारी फेटाळून लावली़ विकास यादव आणि त्याचा चुलत भाऊ विशाल या नितीशच्या दोन मारेकऱ्यांची शिक्षा जन्मठेपेत कुठलीही सवलत न देता न्यायालयाने २५ वर्षांपर्यंत वाढवली़ शिवाय पुरावे नष्ट केल्याबद्दल त्यांना पाच वर्षांनी अतिरिक्त शिक्षा ठोठावली़ आता विकास व विशाल यांना आता एकूण ३० वर्षांची शिक्षा भोगावी लागेल़

नवी दिल्ली : बहुचर्चित नितीश कटारा हत्याकांड प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज शनिवारी फेटाळून लावली़ विकास यादव आणि त्याचा चुलत भाऊ विशाल या नितीशच्या दोन मारेकऱ्यांची शिक्षा जन्मठेपेत कुठलीही सवलत न देता न्यायालयाने २५ वर्षांपर्यंत वाढवली़ शिवाय पुरावे नष्ट केल्याबद्दल त्यांना पाच वर्षांनी अतिरिक्त शिक्षा ठोठावली़ आता विकास व विशाल यांना आता एकूण ३० वर्षांची शिक्षा भोगावी लागेल़
उत्तर प्रदेशातील राजकीय नेते डी़पी़ यादव यांचा मुलगा विकास आणि त्याचा चुलत भाऊ विशाल यांच्यासह सुखदेव पहेलवान अशा तिघांना दोषी मानत कनिष्ठ न्यायालयाने गतवर्षी एप्रिलमध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती़ नितीशची आई नीलम कटारा आणि दिल्ली पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निकालास दिल्ली उच्च न्यायालत आव्हान देत या तिघांनाही फाशी देण्याची मागणी केली होती़
न्या़ गीता मित्तल आणि जे़ आर मिधा यांच्या विशेष खंडपीठाने आज शनिवारी फाशीची मागणी करणारी संबंधित याचिका खारीज केली़़ न्यायालयाने नितीशच्या हत्येसाठी विकास आणि विशाल या दोघांची शिक्षा २५ वर्षांपर्यंत वाढवली़ यासोबतच पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली या दोघांना पाच वर्षांची अतिरिक्त शिक्षा आणि प्रत्येकी ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला़ या प्रकरणातील अन्य एक दोषी सुखदेव पहलवान याची शिक्षाही न्यायालयाने २५ वर्षांपर्यंत वाढवली़ तिन्ही आरोपींना अतिरिक्त पाच वर्षांची शिक्षा सोडून शिक्षेचा उर्वरित अवधी कुठल्याही सवलतीशिवाय कठोर सश्रम कारावासाच्या रूपात भोगावा लागेल़ यापैकी विकासने रुग्णालयात घालविलेला अवधी(१० ऑक्टोबर २०११ ते ४ नोव्हेंबर २०११) त्याने तुरुंगात आत्तापर्यंत भोगलेल्या शिक्षेत गणला जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़
विकास, विशाल आणि सुखदेव पहेलवान या तिघांनी मिळून १६ ते १७ फेबु्रवारी २००२ च्या रात्रीदरम्यान नितीशचे अपहरण करून नंतर त्याची हत्या केली होती़ नितीश आणि डीपी यादव यांची मुलगी भारती यांचे प्रेमसंबंध होते़ विकास आणि विशाल या दोघांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता़

बॉक्स
नीलम कटारा सर्वोच्च न्यायालयात जाणार
नितीशच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी करणारी याचिका फेटाळली त्यावेळी नितीशची आई नीलम कटारा या न्यायालयात हजर होत्या़ फाशीची मागणी फेटाळल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली़ मात्र त्याचवेळी शिक्षेत वाढ केल्याबद्दल समाधानही व्यक्त केले़ उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ न्यायालयाने मला दिलेल्या नुकसानभरपाईची गरज नाही़ कारण एवढी मोठी रक्कमही माझ्या मुलाच्या जीवाची भरपाई करू शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या़