नितीश- बिहार पॅकेज विशेष पॅकेज हा तर बिहारचा हक्कच- नितीशकुमार
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
पाटणा : विशेष पॅकेज ही मागणी नसून बिहारचा हक्कच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. राज्याला विशेष मदत मिळवून देण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना मोदींनी याचना म्हटले आहे. बिहार आणि बिहारच्या जनतेसाठी मला वारंवार याचक बनून कुणाच्या दारावर जावे लागत असेल तर त्यात मला कोणतीही लाज वाटणार नाही.
नितीश- बिहार पॅकेज विशेष पॅकेज हा तर बिहारचा हक्कच- नितीशकुमार
पाटणा : विशेष पॅकेज ही मागणी नसून बिहारचा हक्कच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. राज्याला विशेष मदत मिळवून देण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना मोदींनी याचना म्हटले आहे. बिहार आणि बिहारच्या जनतेसाठी मला वारंवार याचक बनून कुणाच्या दारावर जावे लागत असेल तर त्यात मला कोणतीही लाज वाटणार नाही. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत मला विस्तृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. मोदी सांघिक सहकार्यावर बोलतात मात्र वागतात वेगळे. ते नेहमीच राज्य सरकारांना अपमानित करीत आले आहेत, असेही ते म्हणाले. विशेष दर्जा आणि पॅकेजमध्ये फरक असतो. विशेष दर्जा देण्याचे आश्वासन दिले असता पॅकेेजवर बोळवण करण्यात आल्याचे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी वेगळे टिष्ट्वट करीत म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी मोदींनी काळा पैसा मायदेशी परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे हे पॅकेज आहे. बिहारच्या जनतेसाठी हा निवडणूक जुमला आहे, असेही लालूप्रसाद यांनी नमूद केले. नितीशकुमार यांनी मोदींचे पाटणा विमानतळावर स्वागत केले, मात्र ते अराह येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. बिहारचे रस्ते बांधणी मंत्री राजीव रंजन सिंग लल्लन मात्र व्यासपीठावर हजर होते.