शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वल निकम यांच्या घरी आनंदोत्सव विधी क्षेत्रात समाधान : नितीन गडकरी यांनी केले निवासस्थानी अभिनंदन

By admin | Updated: January 26, 2016 00:05 IST

जळगाव : राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाला उधाण आले. त्यांच्या कुटुंबियांनी निकम यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

जळगाव : राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाला उधाण आले. त्यांच्या कुटुंबियांनी निकम यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
गेले अनेक वर्ष राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले ॲड.उज्ज्वल निकम यांच्या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. त्याबाबतची माहिती सोमवारी दुपारी जळगावात समजली. त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती निकम यांनी त्यांचे औक्षण करीत पेढा भरवून अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईवडिलांच्या फोटोजवळ जात नमस्कार केला. पुरस्काराची घोषणा झाली त्यावेळी त्यांचे मोठे बंधू दिलीपराव निकम, मोठ्या वहिनी शैलजा निकम, चिरंजीव ॲड.अनिकेत निकम यांच्यासह कुटुंबीय घरी होते.
त्यानंतर दुपारी राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिलेचा शुभारंभ करण्यासाठी आलेले केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन ॲड.निकम यांचे अभिनंदन केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार ए.टी.पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, राजेंद्र फडके यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
निकम यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात आनंद व्यक्त करण्यात आला. विधी क्षेत्रातील तज्ज्ञांनी उज्ज्वल निकम यांची निवड म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असल्याची भावना व्यक्त केली.