नेसरीतील एकाला मारहाण; चौघांना अटक
By admin | Updated: May 12, 2014 21:35 IST
नेसरी : लग्नकार्यावेळी झालेल्या वादावादीच्या कारणावरून नेसरी येथे रविवारी रात्री एका महिलेसह चौघांनी मारहाण केल्याची फिर्याद जखमी युवक सुरेश उर्फ बबलू बाळकृष्ण नाईक यांने नेसरी पोलिसांत दिली. याबाबत नेसरीतील चौघांवर मारामारीचा गुन्हा नोंद झाला असून, त्यांना अटक केली आहे.
नेसरीतील एकाला मारहाण; चौघांना अटक
नेसरी : लग्नकार्यावेळी झालेल्या वादावादीच्या कारणावरून नेसरी येथे रविवारी रात्री एका महिलेसह चौघांनी मारहाण केल्याची फिर्याद जखमी युवक सुरेश उर्फ बबलू बाळकृष्ण नाईक यांने नेसरी पोलिसांत दिली. याबाबत नेसरीतील चौघांवर मारामारीचा गुन्हा नोंद झाला असून, त्यांना अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी हा परवा झालेल्या लग्ना दिवशी झालेल्या वादावादीप्रसंगी तेथे हजर होता, असा गैरसमज करून घेऊन रविवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या घरी जात असताना संगनमताने त्याला मारहाण केली. संशयित बाबूराव महादेव नाईक यांने आपल्या हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले, तर संशयित आकाश बाबूराव नाईक, किसन बाबूराव नाईक व शोभा बाबूराव नाईक यांनी लाथाबुक्क्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही मारामारी येथील मसणाई मंदिरासमोरील कुे कापड दुकानासमोर झाली. तपास बी. एस. कोचरगी करत आहेत. वार्ताहर