शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदीने रद्द झालेल्या पासपोर्टवर चारवेळा केली परदेशवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 12:49 IST

परराष्ट्र मंत्रालयाने 24 फेब्रुवारी रोजी नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला होता.

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेकडून 12 हजार कोटींचे कर्ज घेऊन फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदी रद्द झालेल्या पासपोर्टवर बिनदिक्कतपणे परदेशवाऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरपोलने यासंदर्भात भारतीय तपासयंत्रणांना माहिती दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने 24 फेब्रुवारी रोजी नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला होता. मात्र, त्यानंतरही नीरवने चारवेळा हा पासपोर्ट वापरला. मार्च महिन्यात त्याने या पासपोर्टचा शेवटचा उपयोग केला होता. इंटरपोलने 5 जून रोजी यासंदर्भात पत्र पाठवून भारतीय तपासयंत्रणांना माहिती दिली आहे. त्यानुसार नीरवने 15 मार्च ते 31 मार्च या काळात अमेरिका, ब्रिटन आणि हाँगकाँग या देशांमध्ये प्रवास केला. काही दिवसांपूर्वी नीरव मोदीने लंडनमध्ये राजाश्रयाची मागणीही केली होती. त्यानंतर आता नीरव ब्रसेल्सला पळून गेला आहे. मात्र, यासाठी त्याने भारताच्या नव्हे तर सिंगापूरच्या पासपोर्टचा वापर केला. तो सिंगापूरच्या पासपोर्टवर प्रवास करत असेल, तर या प्रकरणात भारत सरकार कोणतीच कार्यवाही करू शकत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा