श्रीनगर : जम्मू-काश्मिरात सोमवारी स्फोटाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जवानांसह नऊ जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात बसस्थानकाजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनात झालेल्या स्फोटात दोन जवान व तीन पोलीस जखमी झाले. वाहनातील अश्रुधुराचे नळकांडे फुटल्याने स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दुसऱ्या घटनेत गांदेरबल जिल्ह्यात सोनामार्गमध्ये निर्माणाधिन पुलाजवळच्या स्फोटात चार कामगार जखमी झाले. (वृत्तसंस्था) >हंदवाडामध्ये शोध मोहीमसुरक्षा दलांनी कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडा क्षेत्रातील जंगलांमध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची सूचना मिळाल्यावर संपूर्ण परिसरात सोमवारी शोध मोहीम सुरु केली. दहशतवाद्यांचा शोध लागला नाही.
काश्मिरातील स्फोटात पाच जवानांसह नऊ जखमी
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST