शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दररोज नऊ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 14, 2016 01:01 IST

परिस्थितीमुळे विवश झालेले महाराष्ट्रातील नऊ शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील परिस्थिती काय आहे. सरकारने कृषी

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीपरिस्थितीमुळे विवश झालेले महाराष्ट्रातील नऊ शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील परिस्थिती काय आहे. सरकारने कृषी संकटावर मात करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याबद्दल श्वेतपत्र जारी करावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी केली आहे.देशातील दहा राज्ये दुष्काळाच्या खाईत सापडली आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून गंभीर चिंतेची बाब बनली आहे. त्यांचे ऐकून घ्यायला कुणीही नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी येथे म्हटले. लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविण्यात आले, मात्र ते उंटाच्या तोंडात जीरे देण्यासारखे आहे. एकट्या लातूरला त्यापेक्षा शंभर पट जास्त हवे असून तरच लोकांची गरज भागू शकेल, असेही ते म्हणाले. दुष्काळ असतानाही मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मृतदेहांवर राजकारण चालविले आहे. मोदींचा डांगोरा पिटला जावा यासाठी पाणी पाठविल्या जाणाऱ्या रेल्वेवर प्रचारसामग्री लावली जात आहे.काय सांगते आकडेवारीमोदी सरकारच्या कारकीर्दीत वर्षभरात महाराष्ट्रामध्ये ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. देशातील २४३ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. हे आम्ही नव्हे तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत सरकारची कानउघाडणी केलेली आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी देताना सिंघवी म्हणाले की, यातील ८३ शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.