(निनाद) पवार विद्यालयात स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
आळंदी : डुडूलगाव येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
(निनाद) पवार विद्यालयात स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन
आळंदी : डुडूलगाव येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, का करावी, याविषयी जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. एस. एम. पाटील यांनी मार्गदर्शन केले. दीपाली मानकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ अध्यक्षस्थानी होते. स्पर्धा परीक्षा समितीप्रमुख प्रा. आर. एस. कदम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. धनंजय मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मुल्ला, प्रा. कांबळे, प्रा. साळुंके व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. ०००००