शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

(निनाद) एसटी बसच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

बसचालकाला अटक : संतप्त जमावाने केली तोडफोड

बसचालकाला अटक : संतप्त जमावाने केली तोडफोड
चाकण : बसस्थानकात भरधाव वेगाने वळणार्‍या एसटीची धडक बसल्यामुळे एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चाकण बसस्थानकात घडली. घटनेनंतर संतप्त तरुणांनी एसटी. बसच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे.
बबनराव ऊर्फ आनंदराव गणपतराव सोनवणे (वय ८०, रा. ब्राšाण आळी, माणिक चौक, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. एसटी बसचालक ज्ञानेश्वर अरगडे यास पोलिसांनी उशिरा अटक केली. याप्रकरणी कालिदास वसंतराव सोनवणे (वय ३१, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण बसस्थानकात सोमवारी (दि. ६) भोरगिरीहून बोरीवलीला जाणारी बस बसस्थानकातून दुपारी २ वाजता चाकण बसस्थानकात भोरगिरीहून बोरीवली मुंबईकडे जाणारी एसटी भरधाव वेगाने चाकण बसस्थानकातून निघाली. या वेळी स्थानकातून जाणारे बबनराव सोनवणे या गाडीच्या मागच्या चाकाखाली आले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी संतप्त जमावाने बसचे व वाहतूक नियंत्रण कक्षाचे नुकसान केले. संतप्त जमावाला पोलिसांनी वेळीच शांत केले. बबनराव सोनवणे आझाद मित्र मंडळाचे कार्यकर्ते होते. अण्णा या नावाने ते ओळखले जात. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. चाकण ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्णा सोनवणे, उद्योजक राजू सोनवणे, चक्रेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष जीवन सोनवणे, बाबा सोनवणे यांचे ते वडील होत.
सोनवणे यांच्या निधनामुळे परिसरातील व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार लांडे करीत आहेत.

फोटो : अपघातानंतर एसटी बसचे संतप्त जमावाने केलेले नुकसान व जमलेला जनसमुदाय. (हनुमंत देवकर)