नाशिक : अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच आयोजित राज्यस्तरीय एकता अधिवेशन झाले. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी सेवा केल्याबद्दल या अधिवेशनात पेन फिजिशियन डॉ. निलेश वर्धमान लोढा यांना जिल्हास्तरीय समाजरत्न या पुरस्काराने अरूण गुजराथी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.पेन मॅनेजमेंट ह्या नवीन मेडिकल शाखेची ख्याती वाढविण्यात व जवळपासच्या ५० गावात विविध शिबीरे घेऊन विना ऑपरेशन सेवा गरजु व गरीब रुग्णांपर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मणके व सांधे विकार यावर विना ऑपरेशन आधुनिक उपचार करणारे डॉ. निलेश लोढा हे नाशिकमधील एकमेव तज्ज्ञ आहेत.फोटो : अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच आयोजित राज्यस्तरीय एकता अधिवेशनात अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्कार स्वीकारतांना पेन फिजिशियन डॉ. निलेश वर्धमान लोढा.
निलेश लोढा जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
By admin | Updated: January 23, 2016 00:07 IST