बेळगावी : अंधश्रद्धा आणि भूतप्रेत या विरोधात जनजागृती करण्यासाठी कर्नाटकचे अबकारी शुल्कमंत्री सतीश जारकिहोली यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्मशानभूमीत एक रात्र घालविली.
महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधून जारकिहोली आणि समर्थकांनी बेळगावी येथील महानगरपालिकेच्या वैकुंठधाम या स्मशानभूमीवर रात्र घालविली. जारकिहोली आणि शेकडो लोकांनी यावेळी स्मशानातच रात्रीचे जेवण घेतले. अंधश्रद्धा ही अनेक समस्यांचे मूळ कारण आहे. ती दूर केल्याशिवाय खालच्या जातीच्या न्याय मिळवून देता येणार नाही. मी लक्ष्मीला मानत नाही. तरीही माझा वार्षिक 6क्क् कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय आहे, असे जारकिहोली यांनी स्पष्ट केले.