शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पबमधील नायट्रोजन कॉकटेलने पोटात पडले छिद्र

By admin | Updated: July 4, 2017 16:39 IST

दिल्लीतील एका 30 वर्षीय व्यावसायिकांने पबमधील ड्रिंकसोबत लिक्विड नायट्रोजनचे सेवन केल्याने त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 04 - सध्या तरुणांमध्ये नव-नवीन पदार्थांची चव चाखण्याची क्रेझ वाढल्याचे दिसून येते. मात्र, अनेक वेळा अशी क्रेझ कधी अंगलट येईल हे सांगता येणार नाही. कारण, दिल्लीतील एका 30 वर्षीय व्यावसायिकांने पबमधील ड्रिंकसोबत लिक्विड नायट्रोजनचे सेवन केल्याने त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
सुमित प्रसाद (नाव बदललेले आहे) हा व्यावसायिक गुडगाव येथील एका पबमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने पबमधील लेटेस्ट लिक्विड नायट्रोजन असलेले कॉकटेल ऑर्डर केले. असे सांगण्यात येते की, ड्रिंक लवकर फ्रीज करण्यासाठी त्यामध्ये लिक्विड नायट्रोजनचा वापर करण्यात येतो. दरम्यान, या कॉकटेलचे सेवन केल्यानंतर सुमितला काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर, तो जमीनीवर कोसळला असता त्याला लगेचच मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचे पोट फुगले होते. तसेच, रुग्णालयात दाखल केल्यानंतर रक्त तपासणीत समजले की, त्याच्या शरिरामध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त झाले होते. 
कोलंबिया एशिया रुग्णालयाचे डॉक्टर अमित गोस्वामी यांनी सांगितले की, सुमितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याचा पल्स रेट वाढला होता आणि रक्तदाब कमी झाला होता. तसेच, सीटी स्कॅन केल्यानंतर समजले की पोटाखालील भागाला छिद्र पडल्याचे. आम्ही त्याच्यावर उपचार केले असून त्याला उपचारानंतर तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आता तो सुखरुप आहे. 
दरम्यान, ही घटना 13 एप्रिल रोजी घडली होती.