शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

आरीफ माजिदला आठ डिसेंबरपर्यंत NIA ची कोठडी

By admin | Updated: November 29, 2014 15:33 IST

इस्लामिक स्टेटसाठी इराकमध्ये लढायला गेलेल्या कल्याणच्या आरीफ माजिदला आठ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २९ - इस्लामिक स्टेटसाठी इराकमध्ये लढायला गेलेल्या व भारतात परत आणण्यात आलेल्या कल्याणच्या आरीफ माजिदला आठ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याण येथून अचानक गायब होऊन इराक आणि सीरियात इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने चालवलेल्या संघर्षात सामील झालेल्या चार तरुणांपैकी आरिफ माजिद हा तरुण रिसर्च अँड अनालीसिस विंग (रॉ) या हेर संस्थेच्या प्रयत्नांतून शुक्रवारी तुर्कस्थानमधून भारतात परतला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
माजिद कुणा कुणाच्या संपर्कात होता, भारतामध्ये इसिससाठी आणखी कोण काम करत आहे, इराकमध्ये तो कुणाला भेटला, त्यानं नक्की तिथे काय केलं, त्याच्यावर भारतामध्ये काही कामगिरी पार पाडण्याची तर जबाबदारी दिलेली नाही ना, अशा अनेक प्रश्नांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेने माजिदची कोठडी मागितली होती. न्यायालयाने एनआयआयचे हे म्हणणे मान्य करत आठ डिसेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या चेह-यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. त्यामुळे त्याचे ब्रेनवॉशिंग पद्धतशीरपणे झाले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच माजिदप्रमाणे आणखी किती भारतीय तरूण अशा प्रकारच्या ब्रेनवॉशिंगचे शिकार झाले आहेत हा प्रश्नही एनआयआयपुढे आहे.
आरिफला मुंबईत आणल्यानंतर काही तासांतच केंद्रीय गृहखात्याने त्याला अटक करण्याची सूचना एनआयएला केली. आरिफसह इसिस आणि या दहशतवादी संघटनेच्या हस्तकांविरोधात भा.दं.वि.च्या कलम 125 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो दोषी सिद्ध झाल्यास आरिफला अधिकाधिक जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 
आरिफला मुंबईत आणल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. तसेच त्याला सकाळी मुंबईत आणल्याचे सुरक्षा यंत्रणोकडून त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आले होते, असेही सुत्रांनी सांगितले. 
शुक्रवारी दिवसभर एनआयएने आरिफला त्याने मे महिन्यात घर सोडण्यापासून आजवरच्या घटनाक्रमाबाबत विचारणा केली, असे सूत्रांनी सांगितले. मात्र त्याच्या परतण्याने बरेच प्रश्न उभे केले असून, त्याच्या तपासातून या तरुणांची माथी भडकवणा:यांचा तसेच त्यांना भारतात आणि इराकमध्ये साहाय्य करणा-यांचा छडा लागू शकतो. 
कल्याणमधील आरिफ माजिद, शहीन टंकी, फहद शेख आणि अमान तांडेल हे चार जण 23 मे रोजी अन्य 22 जणांबरोबर इराकमधील धार्मिक स्थळांची तीर्थयात्र करण्याच्या निमित्ताने विमानाने बगदादला गेले होते. 
दुस:या दिवशी आरिफने त्याच्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून कळवले होते, की ते इराकला गेले आहेत आणि पूर्वसूचना न देता गेल्याबद्दल माफी मागितली होती. भारतात परतल्यावर त्यांच्या सहप्रवाशांनी हे चौघे बगदादहून टॅक्सी भाडय़ाने घेऊन इराकमधील फालुजा येथे गेल्याचे सांगितले होते. दरम्यान, यापैकी एकाच्या मृत्यूचेही वृत्त आले होते.