बिजनौर/ नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी मोहम्मद तन्जील अहमद यांची मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी सुमारे २४ गोळ्या घालून हत्या केली. या घटनेत चार गोळ्या लागून अहमद यांच्या पत्नी फरजाना याही गंभीर जखमी झाल्या. एनआयएचे महानिरीक्षक संजीव कुमार यांनी हा सुनियोजित हल्ला असल्याचे स्पष्ट केले आहे.अहमद हे बिजनौर जिल्ह्यातील नात्यातील दोन मुलींच्या लग्नाला हजेरी लावून शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.४५च्या सुमारास सहासपूर या गावी परतत असताना हा हल्ला झाला. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अहमद यांची वॅगन-आर मोटार अडवून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. अहमद यांची मागच्या सीटवर बसलेली १४ वर्षांची मुुलगी आणि १२ वर्षांच्या मुलाला मातापित्यावर अंदाधुंद गोळीबार होत असल्याचे हादरून सोडणारे दृश्य बघावे लागले. हा दहशतवादी किंवा सुनियोजित हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी फेटाळलेली नाही.
एनआयए अधिकाऱ्याची हत्या
By admin | Updated: April 4, 2016 03:21 IST