शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

झाकिर नाईकला 14 मार्चपर्यंत हजर राहण्याची NIAची नोटीस

By admin | Updated: March 7, 2017 23:54 IST

इस्लामिकचे वादग्रस्त उपदेशक झाकीर नाईकला एनआयएनं चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात 14 मार्चपर्यंत हजर राहण्याची नोटीस बजावली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - इस्लामिकचे वादग्रस्त उपदेशक झाकीर नाईकला एनआयएनं चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात 14 मार्चपर्यंत हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने झाकिर नाईकची बहीण नैलाह नुरानीची आज चौकशी केली. चिथावणीखोर भाषण करून तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यास प्रोत्साहन दिल्याचे झाकीर नाईकवर आरोप झाल्यानंतर सरकारने त्याच्या पीस टीव्हीसह संकेतस्थळांवर बंदी घातली होती. एनआयए आणि मुंबई पोलिसांनी त्याच्या मुंबईतील मालमत्तांवर छापा टाकून तपासणीही केली असता नाईकने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पैशांची मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. तरुणांना दहशतवादाकडे जाण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल एनआयएने नाईकविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा नोंदवला असून, मुस्लिम तरुणांना भडकावण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनीही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अंमलबजावणी संचालनालयाने नाईकला समन्स बजावून जानेवारीच्या अखेरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले असतानाही नाईक सक्तवसुली संचलनालयासमोर हजर झाला नव्हता. पोलिसांनी अटक करू नये म्हणून नाईक सौदी अरेबियात लपून बसल्याचे सांगण्यात येत होते. नाईकने अवैधरीत्या पैसे कुठून जमवले आहेत आणि त्यांचा गुन्ह्यांसाठी वापर कसा केला आहे, याचीही ईडी चौकशी करत आहे. नाईकचं घर आणि कार्यालयातून हस्तगत केलेली अनेक कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली आहे.दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर ईडीने झाकीर नाईकला वारंवार समन्स बजावलेत. काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकने त्याच्या वकिलांमार्फत ईडीला उत्तर दिले होते. हजर होण्याबाबत नाईकने काही महिन्यांची मुदत मागून घेतली होती. तसेच स्काइप, फोनवरून ईडीच्या चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे. तसेच ईडीला हवी असलेली सर्व कागदपत्रे, माहिती देण्यास तयार असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. मात्र अंमलबजावणी संचलनालयानं झाकीर नाईकची ही मागणी फेटाळून लावली होती. आर्थिक गैरव्यवहारांतर्गत अशा प्रकारची तरतूद नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते.