शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएकडून लवकरच होणार चौकशी

By admin | Updated: July 18, 2014 01:35 IST

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याची भेट घेणारे पत्रकार वेदप्रताप वैदिक यांचा लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जाबजबाब घेतला

नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याची भेट घेणारे पत्रकार वेदप्रताप वैदिक यांचा लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जाबजबाब घेतला जाण्याची शक्यता आहे. हाफिज हा २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार असून यानिमित्ताने वैदिक यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. रा.स्व.संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी रामदेव बाबा यांचे निकटस्थ असलेल्या वैदिक यांना समर्थन जाहीर केले असतानाच चौकशीचा पाश आवळला जाण्याचे संकेत मिळाले आहेत.इंद्रेशकुमार हे भाजपाच्या मुस्लिमांसंबंधी कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. त्यांनी बुधवारी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी वैदिक यांच्यासंबंधी बातम्या वाचल्या आहेत. एका पत्रकाराला त्याच्या इच्छेनुसार कुणालाही भेटण्याचे स्वातंत्र्य असते. वैदिक यांचे मूळ संस्कृतीत रुजले असून ते पक्के राष्ट्रवादी आहेत. त्यांनी केले ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच केले असावे. सरकारने वैदिक -हाफिज भेटीची निंदा केली असतानाच इंद्रकुमार चर्चेत आले आहेत.वैदिक हे रा.स्व.संघाच्या कार्यात सहभागी असल्याचा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला आरोप इंद्रकुमार यांनी फेटाळून लावला. वैदिक यांनीही स्वत: रा.स्व.संघात सहभागी असल्याचा इन्कार केला आहे. वैदिक हे गुरू रामदेव यांचे खास निकटस्थ मानले जात असून भाजपाच्या नेतृत्वातील सरकारनेच वैदिक-हाफिज भेट घडवून आणल्याचा विरोधकांनी केलेला आरोप विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी फेटाळला आहे. हाफिज याची भेट कशी घेतली, त्याच्याकडून कोणती माहिती घेतली हे जाणून घेण्यासाठी वैदिक यांना एनआयए प्रश्न विचारू शकते. सईद याच्याशी झालेल्या भेटीतून काही प्रतिकूल निष्पत्ती निघाल्यास वैदिक यांना आरोपी मानले जाऊ शकते. मुख्यत: मुंबई हल्ल्यासंबंधी प्रश्न विचारले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)