शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी देणगीदारांकडून ‘फिल्ड रिपोर्ट’ साठी एनजीओचा वापर

By admin | Updated: July 17, 2014 02:19 IST

काही परदेशी देणगीदार ‘फिल्ड रिपोर्ट’ मिळविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा (एनजीओ) वापर करीत आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी नमूद केले

नवी दिल्ली : काही परदेशी देणगीदार ‘फिल्ड रिपोर्ट’ मिळविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा (एनजीओ) वापर करीत आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी नमूद केले. राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांच्या अतारांकित प्रश्नाला मंत्र्यांनी बुधवारी दिलेल्या लिखित उत्तरात ही बाब पुढे आली.गृहमंत्रालयाने स्वयंसेवी संस्थांच्या अनियमिततेची २४ प्रकरणे सीबीआयकडे सोपविली आहेत. आणखी १० प्रकरणे अधिक तपासासाठी संबंधित राज्य पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. एनजीओंच्या उपक्रमांची चौकशी सरकारने सुरू केली आहे काय आणि एनजीओंच्या किती उपक्रमांमध्ये सरकारला गडबड आढळून आली आहे, त्यापैकी कितीजणांविरुद्ध खटला भरण्यात आला आहे, असा प्रश्न दर्डा यांनी विचारला होता. परदेशी देणगीदार स्थानिक एनजीओंकडून ‘फिल्ड रिपोर्ट’ मागवतात आणि त्याचा वापर भारताच्या विरोधात केला जातो. पाश्चिमात्य सरकारांच्या हितासाठी सामरिक परदेशी धोरणाकरिता त्याचा शस्त्रसारखा वापर होतो. ही वस्तुस्थिती आहे काय, असा प्रश्न उपस्थित केल्यावर मंत्री म्हणाले, काही परदेशी देणगीदार स्थानिक एनजीओंचा ‘फिल्ड रिपोर्ट’ मिळवण्यासाठी वापर करीत असल्याची माहिती आहे.ग्रीनपीस ही एनजीओ अमेरिकेतील कोळसाविरोधी लॉबिंग गटाला हाताशी धरून भारताच्या ऊर्जा प्रकल्पांना अस्थिर करू पाहत आहे आणि भारताच्या ‘राष्ट्रीय आर्थिक सुरक्षे’ला धोका पोहोचवू पाहत आहे, असा अहवाल अलीकडे आयबीने दिला होता. आयबीने ग्रीनपीसची एफसीआरए नोंदणी रद्द करण्याचा सरकारला सल्ला दिला. (लोकमत न्यूजवर्क)