शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार परिषदेच्या बातम्या

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

मराठा विद्या प्रसारक समाजाची निवडणूक

मराठा विद्या प्रसारक समाजाची निवडणूक
नागपूर : मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक १२ जुलैला संस्थेच्या सक्करदरा येथील कार्यालयात होत असून या निवडणुकीत स्वाभिमानी पॅनलला निवडून आणण्याचे आवाहन नरेंद्र मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केले. स्वाभिमानी पॅनलचे नेतृत्व राजे मुधोजी भोसले करीत असून निवडणुकीत १५०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संस्थेतर्फे भविष्यात सभागृह, समाजाच्या सभागृहाचे आधुनिकीकरण, सभासद संख्या वाढविणे, शाळेसाठी इमारतीची व्यवस्था, संस्थेच्या शाळेत सीबीएसई पॅटर्नची सुरुवात, शिवचरित्रावर आधारित कला दालन, वाचनालय, वसतिगृह, समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे वर्ग, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, महिलांसाठी गृह उद्योग आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राजे मुधोजी भोसले, मनोहर मोहिते, भाऊसाहेब सुर्वे, शितल सुरुशे आदी उपस्थित होते.
............
आरोग्य, सुरक्षेचा अभ्यासक्रमात समावेशाची मागणी
नागपूर : भारतात विविध अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण ५० ते ७५ हजार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या पदविकेत आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण या विषयाचा समावेश करण्याची मागणी हर्षवर्धन जगम यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे सांगुन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत कायदा करून या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली.
....................
विदर्भ जागरण कार्यक्रमाचा शुभारंभ
राणी निघोट यांची माहिती : प्रत्येक जिल्ह्यातून १०० गावांचा समावेश
नागपूर : नेहरू युवा केंद्राच्यावतीने विदर्भातील अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात २९ जूनपासून विदर्भ जागरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्राच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर राणी निघोट-द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अभियानात प्रत्येक जिल्ह्यातून १०० गावे निवडण्यात आली आहेत. या गावात तीन रथ नेण्यात येणार आहेत. रथावर पोस्टर, बॅनर, शासकीय योजनांची माहिती लावण्यात आली आहे. रथासोबत असलेली प्रशिक्षित युवकांची चमू पथनाट्य, सार्वजनिक सभेच्या माध्यमातून शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, आर्थिक विकास, भष्टाचार आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. २५ सप्टेबरला मथुरा येथे अभियानाचा समारोप होत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शरद साळुंके उपस्थित होते.
................