थोडक्यात बातम्या.....
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
व्यावसायिकांची याचिका दाखल
थोडक्यात बातम्या.....
व्यावसायिकांची याचिका दाखलनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदर येथील सुराणा चेंबरमधील तीन गाळेधारकांची रिट याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. मनपाने गेल्या ८ मे रोजी ही इमारत पाडण्याची नोटीस बजावल्यामुळे ते न्यायालयात आले आहेत. कनिष्ठ अभियंत्याची याचिका निकालीनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रॉनिक) नारायण देवके यांची याचिका निकाली काढली. तसेच, त्यांनी कार्यकारी अभियंता म्हणून कार्य केले तेवढ्या दिवसाचे वेतन देण्याचे निर्देश दिलेत. परिविक्षा काळ वाढविल्यामुळे ते न्यायालयात आले होते.शिक्षकाला पदोन्नती देण्याचे निर्देशनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आलापल्ली येथील शिक्षक राजू आत्राम यांना पदोन्नती देण्याचे निर्देश गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आत्राम यांचा दावा नाकारून दुसऱ्याला कनिष्ठ विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देण्याचा ९ जानेवारीचा वादग्रस्त आदेश रद्द करण्यात आला आहे. आरोपीला जामीननागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीच्या हत्याप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला आहे. विजय चव्हाण असे आरोपीचे नाव असून तो लोणार (बुलडाणा) येथील रहिवासी आहे. त्याची पत्नी मुंबई येथील रहिवासी होती. त्यांनी प्रेम विवाह केला होता. मुलगी राहत्या घरी गळफास लावलेली आढळून आली होती.