शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा वापरून उपग्रह इच्छित कक्षेत नेण्याचे नवे तंत्र

By admin | Updated: June 19, 2017 01:22 IST

अग्निबाणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेऊन सोडलेल्या उपग्रहास नियंत्रित रेटा देऊन इच्छित भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी भारतीय

नवी दिल्ली: अग्निबाणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेऊन सोडलेल्या उपग्रहास नियंत्रित रेटा देऊन इच्छित भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) एक नवे ‘प्रॉपल्शन’ तंत्रज्ञान विकसित करीत असून ते यशस्वी झाल्यास तुलनेने कमी खर्चात उपर्गर सोडण्याचे नवे युग सुरु होऊ शकेल. ‘इलेक्ट्रिक प्रॉपल्शन’ (ईपी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाने सौर ऊर्जेचे विद्युत भर्जेत रूपांतर केले जाते व ही विद्युत ऊर्जा अंतराळात सोडलेल्या उपग्रहास नियंत्रित प्रकारे पुढे रेटा देऊन इच्छित कक्षेत ठरलेल्या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी वापरली जाते. ५ मे रोजी ‘जीसॅट-९’ हा उपग्रह सोडताना हे तंत्रज्ञान प्रथमच प्रायोगिक स्वरूपात वापरले गेले. अग्निबाणाने उपग्रह गुरुत्वाकर्षण रेषेच्या पलिकडे नेऊन सोडला की पृथ्वीपासून ३६ हजार किमी उंचीवर भूस्थिर कक्षेत नेऊन सोडण्यासाठी त्याला ठराविक वेळेला ठराविक जोराने पुढे रेटा द्यावा लागतो. शिवाय वेळोवेळी कक्षेत फेरबदल करण्यासाठी व १०-१२ वर्षांच्या आयुष्यात त्याला एका जागी स्थिर राहण्यासाठीही इंधन लागते. सध्या ‘इन्सॅट/जी सॅट’ वर्गातील दोन जहार किलो वजनाच्या उपग्रहासोबत ८०० ते एक हजार किलो रासायनिक प्रॉपेलंट सोबत न्यावे लागते. मात्र, आता ‘इलेक्ट्रिक प्रॉपल्शन’ तंत्रज्ञान यशस्वी झाले की जेमतेम १०० ते ३०० किलो रासायनिक प्रॉपेलंट न्यावे लागेल. यामुळे खर्च कमी होईलच. शिवाय जास्त वजनाचा उपग्रह सोडणे शक्य होईल, असे थिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. के, शिवन यांनी सांगितले.अहमदाबाद येथील स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी सांगितले की, जीएसएलव्ही एमके -३ या ‘बाहुबली’ अग्निबाणाच्या ५ जून रोजी केलेल्या यशस्वी उड्डाणानंतर ‘इस्रो’ने चार टनापर्यंतचे उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्याची क्षमता प्राप्त केली आहे. तरीही ‘जी’ मालिकेतील पुढील उपग्रह ५.६ टन वजनाचा असल्याने, तो फ्रेंच गियानामधीन ‘एरियान’ अग्निबाणाने सोडला जाईल. त्यानंतर, सोडायचा ‘जीसॅट-२०’ उपग्रह फ्रेंच गियानामधून सोडायच्या उपग्रहाहून पाचपट अदिक शक्तिशाली असेल, पण नव्या तंत्रज्ञानामुळे त्याचे वजन ३.५ टनापर्यंत शक्य होईल व त्याचे प्रक्षेपण ‘बाहुबली’ अग्निबाणाने भारतातून केले जाईल.