शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निरव मोदीवर नवा खटला; सूरत कोर्टाचे अटक वॉरन्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 03:17 IST

सूरत येथील न्यायालयाने मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे.

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी)१३ हजार कोटींचे कर्ज बुडवून चुना लावल्याबद्दल ‘सीबीआय’ व ‘ईडी’ला हव्या असलेल्या निरव मोदी या देश सोडून गेलेल्या हिरे व्यापाऱ्याविरुद्ध आता महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) खटला दाखल केला असून त्यात सूरत येथील न्यायालयाने मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे.‘डीआरआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरे तर हे प्रकरण ‘पीएनबी’ कर्जघोटाळ््याच्या बरेच आधाचे आहे. फायरस्टार इंटरनॅशनल, फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल व रॅडाशिर ज्वेलरी या निरव मोदीच्या तीन कंपन्यांनी ‘ड्युटी फ्री’ पद्धतीने आयात केलेल्या पैलू पाडलेल्या हिºयांची व मोत्यांची हेराफेरी केल्याच्या आरोपावरून हा खटला आहे. अशा प्रकारे अन्यत्र वळविलेला ‘ड्युटी फ्री’ माल १,२०५ कोटी रुपयांचा होता व त्यावरील दंड व व्याजासह बुडविलेले आयात शुल्क ४८.२१ कोटी रुपयांचे होते. या तिन्ही कंपन्यांचे काम सूरतमध्ये चालते.या कंपन्यांनी हॉँगकाँग व दुबई येथे निर्यात करण्यासाठी पाठविलेली सहा पार्सले ‘डीआरआय’ने डिसेंबर २०१४ मध्ये अडवून तपासली होती. त्यातील मालाचे वर्णन, त्यांचे मूल्य व वजन खोटेपणाने नोंदविण्यात आले होते. त्यातील हिºयांचे ‘एफओबी’ मूल्य ४३.१० कोटी रुपये दाखविले गेले होते. प्रत्यक्षात नंतर सरकारमान्य मूल्यकाराने त्याचे मूल्य फक्त ४.९३ कोटी रुपये ठरविले होते. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर ‘डीआरआय’ने मोदी व त्याच्या कंपन्यांविरुद्ध सूरत येथील न्यायालयात खटला दाखल केला. समन्स काढूनही ठरल्या तारखांना त्यांच्यापैकी कोणीही हजेरी न लावल्याने आता मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे.यंदाच्या फेब्रुवारीत ‘डीआरआय’ने आयातशुल्क माफीने आणलेला माल अन्यत्र वळविणे व आयात/ निर्यातीच्या मालाचे वास्तवाहून अधिक मूल्य दाखविणे या संदर्भात आणखी एक गुन्हा मोदी व त्याच्या कंपन्यांविरुद्ध नोंदविला आहे. ‘डीआरआय’च्या म्हणण्यानुसार ज्यावर ५२ कोटी रुपयांचे आयातशुल्क भरावे लागले असते असा ८९० कोटी रुपयांचा माल ‘ड्युटी फ्री’ आणून मोदीने सूरत एसईझेडमधील आपल्या कंपन्यांकडे वळविला, असा कयास असून त्यासंबंधी अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी