शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांविरुद्ध नवी रणनीती

By admin | Updated: May 9, 2017 00:43 IST

नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे देशात गेल्या २0 वर्षात १२ हजारांहून अधिक लोक ठार झालेत. देशातल्या १0 राज्यातले

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे देशात गेल्या २0 वर्षात १२ हजारांहून अधिक लोक ठार झालेत. देशातल्या १0 राज्यातले ६८ जिल्हे नक्षलग्रस्त असले तरी नक्षलवाद्यांच्या ९0 टक्के हल्ल्यांचे केंद्रीकरण सध्या मुख्यत्वे ३५ जिल्ह्यांत आहे. नक्षल समस्येतून देशाची सुटका करण्यासाठी कोणताही शॉर्टकट उपयुक्त नाही, दीर्घकालीन उपायांचाच अवलंब करावा लागणार आहे, असे स्पष्ट करीत गृहमंत्री राजनाथसिंहांनी देशातल्या नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ८ सूत्री रणनीतीची घोषणा केली.नक्षलग्रस्त विभागांसाठी गृहमंत्र्यांनी सुचवलेल्या ८ सूत्री रणनीतीत कुशल नेतृत्व, आक्रमक रणनीती, प्रोत्साहन व प्रशिक्षण, चौकस गुप्तचर यंत्रणा, प्रत्यक्ष कारवाईचे आधुनिक मानदंड, परिणामकारक तंत्रज्ञान, नक्षलवाद्यांचे आर्थिक स्त्रोतांची (फंडिंग) नाकेबंदी, प्रत्येक कृति योजनेसाठी भिन्न रणनीती, या मुद्यांचा समावेश आहे. राज्य सरकारांनी ही रणनीतीला स्वीकारावी, असा आग्रह गृहमंत्र्यांनी बैठकीत केला.छत्तिसगडातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अलीकडेच निमलष्करी दलाचे २५ जवान ठार झाले. या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी नवी रणनीती ठरवण्यासाठी देशातल्या १0 नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोमवारी दिल्लीत बैठक आयोजित केली होती बैठकीला छत्तिसगड, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तरप्रेश, बिहार असे १0 पैकी ६ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थितहोते. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे चंद्रशेखर राव आणि मध्यप्रदेशचे शिवराजसिंग चौहान विविध कारणांमुळे बैठकीला उपस्थित नव्हते.मानवरहित विमानांचा वापर वाढविणे गरजेचे-प्रत्येक बटालियनजवळ मानव रहित विमाने (अनमॅन्ड एरिअल व्हेईकल) (युएव्ही) मोठ्या किंवा मिनी आकारांची असणे अत्यावश्यक आहे. युएव्हीचा वापर सध्या अतिशय कमी प्रमाणात आहे, तो वाढवायला हवा. गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा दलांनी स्थानिक जनतेशी संपर्क साधून संदेशांचे परिणामकारक नेटवर्क उभारण्याची गरज आहे. नक्षल समस्येतून मार्ग काढण्यासाठी कोणतीही अल्पकालिन उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याने या संघर्षात शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लाँग टर्म अशा त्रिस्तरिय रणनीतीचा अवलंब करावा लागेल. नक्षलग्रस्त भागात वाहतुकीसाठी उत्तम दर्जाच्या रूंद रस्त्यांची बांधणी, आवश्यक स्थळांवर सुरक्षा दलांची तैनाती तसेच विकास कार्ये पूर्ण करण्यातही कमालीची आक्रमकता दाखवण्याची आवश्यकता आहे असे गृहमंत्री म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने नक्षलवाद्यांची ठिकाणे शोधून काढली, नव्या रणनीती नुसार सर्व शक्तिनिशी या हल्लेखोरांशी संघर्ष केला तर आपण नक्कीच यशस्वी ठरू शकतो, असा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.