शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ‘स्टिंग’मुळे रावत अडचणीत

By admin | Updated: May 9, 2016 03:17 IST

पदच्युत मुख्यमंत्री हरीश रावत १० मे रोजी उत्तराखंडच्या विशेष अधिवेशनात शक्तिपरीक्षेला सामोरे जात असताना, नव्या स्टिंग आॅपरेशनमुळे अडचणीत सापडले आहेत.

डेहराडून : पदच्युत मुख्यमंत्री हरीश रावत १० मे रोजी उत्तराखंडच्या विशेष अधिवेशनात शक्तिपरीक्षेला सामोरे जात असताना, नव्या स्टिंग आॅपरेशनमुळे अडचणीत सापडले आहेत. आमदारांना पैशाचे आमिष दाखविले जात असल्यासंबंधी नवा व्हिडीओ जारी करीत, भाजपाने खळबळ उडवून दिली. रावत यांनीही काँग्रेसच्या आमदारांना धमक्या देत विविध मार्गाने छळ केला जात असल्याचा आणि केंद्रीय संस्थांकडून त्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करीत प्रत्युत्तर दिले आहे.बंडखोर आमदार हरकसिंग रावत आणि काँग्रेसचे आमदार मदनसिंग बिश्त यांच्यातील संवाद रविवारी एका टीव्ही वाहिनीने जारी करीत, नवे राजकीय वादळ उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर हरीश रावत यांनी केंद्र सरकार आणि भाजपने ब्लॅकमेल करण्याचे राजकारण चालविल्याचा आरोप केला. आमच्या आमदारांना वाटप केलेल्या खाणींमधून मिळालेला पैसा रावत यांनी आमदारांना देऊ केला असून, त्यांना सत्ता स्वत:कडे ठेवायची आहे, असे बिश्त म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले. रावत यांनी स्वत:च्या आमदारांना शांत करण्यासाठी २५ ते ३० लाख रुपये देऊ केले आहेत, असे काँग्रेसचे आमदार सांगत असल्याचे नव्या स्टिंग व्हिडीओवरून स्पष्ट होते. रावत स्वत: घोडेबाजारात गुंतले असल्याचे व्हिडीओवरून दिसून येते, असे भाजपाचे नेते भगतसिंग कोशियारी यांनी दिल्लीत पत्रपरिषदेत सांगितले. यापूर्वी रावत यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना परत पक्षात आणण्यासाठी सौदेबाजी चालविल्याचा व्हिडीओ जारी करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)