शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 05:06 IST

शालेय शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने अध्ययन फलनिष्पत्ती (लर्निंग आऊटकम) योजना तयार केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच विषयासंदर्भातील आकलन क्षमता विकसित करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : शालेय शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने अध्ययन फलनिष्पत्ती (लर्निंग आऊटकम) योजना तयार केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच विषयासंदर्भातील आकलन क्षमता विकसित करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर केंद्र सरकारने राष्टÑीय फलनिष्पत्ती सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आले आहेत. त्यानुसार तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थ्यांना धड वाचता येत नव्हते. तसेच ४७ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारही करता आला नाही.केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मागच्या सरकारच्या ‘पुढच्या वर्गात बढती’ धोरणामुळे शालेय शिक्षणाचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळायचा; परंतु विषयच त्यांना समजत नसे. त्यामुळे सरकारने मागच्या वर्षी सर्व राज्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार २३ राज्यांनी ढकलपास योजना रद्द करण्याचे मान्य केले. त्यानंतर सरकारने या कायद्यात दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गात ठेवण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले.विद्यार्थ्यांना जे काही शिकविले जाते, त्याचे त्यांना आकलन झाले पाहिजे, यादृष्टीने शिकविण्याच्या पद्धतीचे प्रारूप कसे असावे. या सर्व पैलूंवर राष्टÑीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तीन वर्षे संशोधन करून लर्निंग आऊटकम योजनेचे प्रारूप निश्चित केले.एनसीईआरटीच्या क्रमिक अभ्यासक्रमानुसार शाळेत शिकविले जाते होते; परंतु अभ्यास कसा करावे, हे सांगितले जात नव्हते. लर्निंग आऊटकममध्ये शिक्षकांसाठी काही सोप्या पद्धती सुचविण्यात आल्या आहेत.काय आहे योजना?विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासंदर्भात आवड निर्माण करणे, यासाठी शिकवण्याची पद्धत सोपी करून प्रत्येक विषय समजावून सांगितला जाईल. हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्रासह सर्व विषयांचा समावेश आहे. प्रत्येक वर्गासाठी केवळ एक पानाचा लर्निंग आऊटकम असेल.पुस्तके पाहूनच विद्यार्थ्यांत अभ्यासाची आवड निर्माण होते. त्यासाठी वर्णमालेबाबत माहिती देण्यासोबत कविता शिकविताना कशा प्रकारे अक्षर ओळख करावी, याचा यात उल्लेख करण्यात आला आहे.चिन्हे, संकेत, मानचित्रात दिशांची ओळख, चंद्र, सूर्य, तारे तसेच चॉकलेट, टेबल यासारख्या वस्तूंचे चित्र आणि आकारमान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे नमूद करण्यात आले आहे. प्लास्टिक चलनातून आर्थिक व्यवहार कसा करावा, हे समजावून सांगण्यात येणार आहे.