शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

बँकिंग क्षेत्रात नवी क्रांती

By admin | Updated: April 15, 2016 03:14 IST

भारतात राजीव गांधींच्या कारकीर्दीत गावोगावी एसटीडी, पीसीओ सुरू झाले तेव्हा सर्वांना अप्रूप वाटले, कारण याद्वारे साऱ्या जगाशी प्रथमच सारा भारत जोडला गेला होता. आता देशाच्या

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीभारतात राजीव गांधींच्या कारकीर्दीत गावोगावी एसटीडी, पीसीओ सुरू झाले तेव्हा सर्वांना अप्रूप वाटले, कारण याद्वारे साऱ्या जगाशी प्रथमच सारा भारत जोडला गेला होता. आता देशाच्या बँकिंग क्षेत्रातही क्रांती होऊ घातली आहे, कारण देशातल्या अडीच लाख ग्रामपंचायतीत कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) द्वारा बँकिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशात सध्या १ लाख ६0 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत. तिथे पासपोर्टचे फॉर्म, फी, विम्याचे हप्ते, विविध प्रकारची बिले भरण्याबरोबरच रोजगारासाठी अर्ज करणे, आधार कार्ड तयार करणे इत्यादी कामे सध्या चालतात. ग्रामीण भागात अवघे ७ हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स असे आहेत की, जे बँकिंग सुविधाही पुरवतात. येत्या ३ महिन्यांत या कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारा देशातल्या किमान ६0 हजार ग्रामपंचायतींत बँकिंग सुविधा सुरू होणार आहे, अशी माहिती या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिनेश त्यागी यांनी दिली. देशात ६ लाखांहून अधिक खेडी व अडीच लाख ग्रामपंचायती आहेत. सध्या केवळ ३५ हजार खेडी बँकिंग सेवांशी थेट जोडली गेली आहेत. यासाठीच केंद्राने सीएससीच्या कामकाज विस्ताराची योजना व्यापक प्रमाणात अमलात आणण्याचे ठरवले. देशातल्या प्रत्येक सीएससीमधील ज्या सेंटर्समध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ही सेवा लवकरच कार्यरत होऊ शकेल, कारण लॅपटॉप व हाताचे ठसे ओळखणाऱ्या उपकरणाची त्यासाठी आवश्यकता आहे, असे त्यागी म्हणाले.कशी होणार पैशांची देवघेव ?कॉमन सर्व्हिस सेंटर्समध्ये बँकिंग सुविधेची नवी योजना साकार झाल्यानंतर कोणत्याही सरकारी बँकेबरोबर बँकेचा खातेधारक आर्थिक देवाणघेवाणचे व्यवहार करू शकेल.ग्रामीण नागरिकांना केवळ हाताचे ठसे देऊन या सेंटरद्वारे बँकेतले पैसे काढता येतील. कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये देवघेवीचा किमान व्यवहार १00 रुपयांच्या रकमेचा करावा लागेल; मात्र कोणत्याही खातेधारकाला एकावेळी १0 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही.खात्यातून रक्कम कमी होताच त्याची पावती ग्राहकाला मिळेल व बँकेद्वारा रक्कम सर्व्हिस सेंटरच्या खात्यात वर्ग होताच त्या सेंटरचा स्थानिक संचालक ती रक्कम खातेधारकाला अदा करील. या व्यवहाराचे योग्यप्रकारे संचालन करणाऱ्या स्थानिक संचालकाला ५ ते १५ रुपयांचे कमिशन मिळेल, अशी ही योजना आहे.