बेझनबागेत नवे प्राथमिक आरोग्य केंद्र
By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST
नागपूर : महापालिकेने उत्तर नागपुरातील बेझनबाग येथे उभारलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बुधवारी आमदार डॉ. मिलिंद माने व आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
बेझनबागेत नवे प्राथमिक आरोग्य केंद्र
नागपूर : महापालिकेने उत्तर नागपुरातील बेझनबाग येथे उभारलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बुधवारी आमदार डॉ. मिलिंद माने व आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आरोग्य कंे द्राच्या माध्यमातून गरजू व गरीब रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला. प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त संजय काकडे, नगरसेविका रविंदर कौर बावा, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. दीपंकर भिवगडे व डॉ. नीतू सिंग आदी उपस्थित होते. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी तर आभार आशा मौंदेकर यांनी मानले.(प्रतिनिधी)