शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

अलकायदाचा नवीन प्रमुख भारतीय ?

By admin | Updated: October 3, 2014 17:46 IST

अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडातील युनिटचा प्रमुख हा भारतातील उत्तरप्रदेशचा माजी रहिवासी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडातील युनिटचा प्रमुख हा भारतातील उत्तरप्रदेशचा माजी रहिवासी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हा प्रकार समोर येताच  गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी व उत्तरप्रदेश पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 
अल कायदाच्या भारतीय उपखंडातील युनिटचा प्रमुख मौलाना आसीम उमर हा उत्तरप्रदेशचा माजी रहिवासी असल्याचे वृत्त समोर आले आहे. याविषयी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी म्हणाले, आसीम उमर हा भारतीय आहे की नाही यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीवरुन तो भारतीय वंशाचा किंवा भारतीयच असावा असे दिसते. 
आसीम उमरने उत्तरप्रदेशमधील दारुल उल उमलू या मदरशामधून शिक्षण घेतले असून १९९० च्या दशकात तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता. यानंतर त्यांने भारत सोडून कराचीतील मदरसामध्ये शिक्षण घेतले. तिथूनच त्याची दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांशी ओळख झाली असावी असे सूत्रांचे म्हणणे आहे. 
मौलाना आसीम उमरने स्वत:चा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला असून अद्याप त्याने स्वतःची कधीही व्हिडीओ टेप जाहीर केलेली नाही. दहशतवादी संघटनेचे प्रमुख स्वत:ची ओळख न लपवता व्हिडीओ टेप जाहीर करतात.  यामुळे उमर काही तरी लपवत आहे असे अधिका-यांनी निदर्शनास आणून दिले.
भारतीय यंत्रणांनी उमरची माहिती गोळा करण्याचे काम सुरु केले असून सध्या १९९० च्या दशकात सिमीमध्ये सक्रीय असलेल्या लोकांवर लक्षकेंद्रीत केले जात आहे. त्यांच्याकडून उमरविषयी माहिती जमा केली जात असल्याचे अधिका-यांनी सांगितले. तर देवबंदमधील दारुल उल उमलू या मदरशाच्या मौलानांनी या वृत्ताविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. आमच्याकडे अनेक मुलं शिकून जातात. त्यांची माहिती ठेवणे आमच्यासाठी कठीण आहे. छायाचित्र किंवा व्हिडीओ क्लिप बघितल्यास आम्ही आसीम उमरची ओळख पटवू शकू असे मदरशाच्या मौलानांनी सांगितले.