शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीच्या राजकारणाचा काँग्रेसकडून नव्याने विचार

By admin | Updated: August 26, 2014 02:50 IST

देशात उत्तर ते दक्षिणेकडील पोटनिवडणुकीतील निकालाने उत्साहित झालेल्या काँग्रेसने आघाडीच्या राजकारणाचा नव्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीदेशात उत्तर ते दक्षिणेकडील पोटनिवडणुकीतील निकालाने उत्साहित झालेल्या काँग्रेसने आघाडीच्या राजकारणाचा नव्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये जदयू, राजद आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजपाला रोखण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपाला रोखण्यासाठी आघाडी मार्गाचा अवलंब करण्याबद्दल काँग्रेस विचार करू लागला आहे. मात्र, या राज्यांमध्ये काँग्रेससोबत कोणते पक्ष येऊ शकतील, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते विविध राज्यांतील अशा पक्षांची ओळख करून या आठवड्याच्या अखेरपर्यंत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना माहिती देतील. ए.के. अ‍ॅन्टोनी, अहमद पटेल, मधुसूदन मिस्त्री आणि अन्य नेत्यांना अशा प्रकारची शक्यता तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी आहे. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच नव्या घटक पक्षांच्या शोधात आहे. महाआघाडी स्थापन करून भाजपा-शिवसेनेच्या महायुतीला टक्कर द्यायची आहे. समजा काही कारणास्तव महाआघाडी स्थापन होऊ शकली नाही, तर अघोषित ताळमेळ बसविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. परंतु त्यासाठी आधी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी करावी लागणार आहेत; कारण त्यांच्या अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पक्षाचे सरचिटणीस शकील अहमद म्हणाले की, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपा मोदींची लाट असल्याचे सांगून प्रत्येक निवडणूक जिंकण्याचा दावा करीत होती. जनतेने १०० दिवस होण्यापूर्वीच दावा फेटाळून लावला आहे.