शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नवे सरकार दिवाळीआधी!

By admin | Updated: September 13, 2014 04:52 IST

महाराष्ट्राची १२वी विधानसभा निवडण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने शुक्रवारी

नवी दिल्ली : महाराष्ट्राची १२वी विधानसभा निवडण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने शुक्रवारी केल्याने दिवाळीच्या चार दिवस आधीच राज्यात नवे सरकार सत्तेवर येईल, हे स्पष्ट झाले. ज्येष्ठ भाजपा नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातही विधानसभेसोबतच निवडणूक होणार आहे. आचारसंहिताही तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही निर्णय घेण्यास वा तशा घोषणा करण्यास राज्य तसेच केंद्र सरकारवर निर्बंध आले आहेत.राज्याच्या विद्यमान विधानसभेची मुदत येत्या ८ नोव्हेंबर रोजी संपत आहे. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८पैकी ४२ जागा मतदारांनी भाजपा-शिवसेना युतीच्या झोळीत टाकल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेविषयी कमालीची उत्सुकता होती. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत आणि निवडणूक आयुक्त एस. एच. ब्रह्मा व डॉ. नसिम झैदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून अनिश्चितता संपुष्टात आणली.राज्य विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांत १५ आॅक्टोबर या एकाच दिवशी स. ७ ते सा. ५ या वेळात मतदान घेतले जाईल. १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होईल व लोकसभा निवडणुकीत आलेली मोदी सुनामी अद्याप कायम आहे की चार महिन्यांतच ती ओसरली हे त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. या निवडणुकीतराज्यातील आठ कोटी २५ लाखांहून अधिक मतदार मतदार करू शकतील. त्यांच्यासाठी ९० हजार ४०३ मतदान केंद्रांची सज्जता केली जाणार आहे. आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम पाहता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया जेमतेम एक महिन्यात पूर्ण होईल. २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या आठवडाभरात उमेदवारी अर्ज भरायचे असल्याने सत्ताधारी आघाडी व सत्ताकांक्षी महायुती या दोघांनाही एकत्र राहायचे की काडीमोड घ्यायचा याच्या निर्णयासह मतदारसंघ व उमेदवार ठरविण्याचे बिकट काम येत्या काही दिवसांत लगबगीने उरकावे लागणार आहे. याआधी २००९ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक १३ आॅक्टोबर रोजी झाली होती व २२ आॅक्टोबर रोजी निकाल जाहीर झाले होते. त्या तुलनेत यावेळी निवडणूक दोन दिवस नंतर होईल व निकाल तीन दिवस आधी लागतील. (विशेष प्रतिनिधी)