शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टात नवे पाच न्यायाधीश

By admin | Updated: February 16, 2017 00:47 IST

प्रदीर्घ विलंबानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पाच नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायामूर्तींच्या नियुक्तीपत्रांवर स्वाक्षरी

हरिश गुप्ता / नवी दिल्लीप्रदीर्घ विलंबानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पाच नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायामूर्तींच्या नियुक्तीपत्रांवर स्वाक्षरी केली असून, अधिसूचना लवकरच निघेल. ‘लोकमत’ने २८ जानेवारी रोजी याबाबतचे वृत्त दिले होते. नियुक्त केलेल्यांमध्ये मद्रासचे मुख्य न्या. संजय किशन कौल, राजस्थानचे मुख्य न्या. नवीन सिन्हा, केरळचे मुख्य न्या. मोहन एम. शांतनगौडर, छत्तीसगडचे मुख्य न्या. दीपक गुप्ता व कर्नाटकचे न्या. एस. अब्दुल नजीर आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची ३१ मंजूर पदे असताना २३ न्यायमूर्तीच असून, आता ती २८ होईल. उर्वरित ३ नावांसाठी कॉलेजियमची लवकरच बैठक होईल. माजी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि मोदी यांचे जमत नसल्याने न्यायालयांतील नियुक्त्या रखडल्या होत्या. उच्च न्यायालयांतील रिक्त पदेही लवकरच भरली जातील. उच्च न्यायालयांत जवळपास १५२ पदे रिक्त आहेत. नव्या सरन्यायाधीशांशी संबंध सुधारण्यासाठी मोदींनी नववर्षदिनी त्यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या होत्या. राष्ट्रपती भवनातील मेजवानीतही त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. गेल्या २५ दिवसांत ते तीनहून अधिक वेळा भेटले आहेत. सरन्यायाधीश खेहर हे कामसू, कडक शिस्तीचे असून प्रकाश झोतात राहणे त्यांना आवडत नाही.