शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या डान्सबार कायद्याला स्थगिती नाही

By admin | Updated: September 22, 2016 04:50 IST

मुंबईतील तीन डान्स बार जुन्या कायद्याच्या आधारे चालू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात डान्सबार्सना परवानगी देणे आणि त्यांचे कामकाज कसे चालावे यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या कायद्याची अमलबजावणी स्थगित करण्यास बुधवारी नकार देतानाच, मुंबईतील तीन डान्स बार जुन्या कायद्याच्या आधारे चालू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. तसेच डान्स बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास, तिथे जाणाऱ्यांच्या खासगी आयुष्यावर गदा येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तथापि, या कायद्यातील काही तरतुदींबद्दल प्रश्न उपस्थित केले. काही मिनिटेच चाललेल्या या सुनावणीत खंडपीठाने महाराष्ट्र हॉटेल्स, रेस्टाँरंट्स आणि बार रुम्समधील अश्लील नृत्य प्रतिबंध आणि महिलांच्या (तेथे काम करणाऱ्या) प्रतिष्ठेचा कायदा, २०१६ मधील काही तरतुदींबद्दल प्रश्न विचारले. जेथे नृत्य चालते, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे कसे लावता येतील? त्यामुळे खासगीपणा जपण्याच्या हक्काचे उल्लंघन होणार नाही का? असे सवाल न्यायालयाने उपस्थित केले. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे डान्सबार्सच्या प्रवेशद्वारापाशी लावण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, असे खंडपीठाने म्हटले. डान्सबार्समध्ये जेथे नृत्य चालते, तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना मनाई करून पोलिसांना त्यांच्या चौकशीच्या अधिकारापासून वंचित करता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद महाराष्ट्राचे वकील शेखर नाफडे यांनी केला होता. त्यावर खासगी आयुष्याच्या अधिकारांचे त्यामुळे उल्लंघन होईल, असे न्यायालयाने नमूद केले.ही सगळी सुरक्षा व्यवस्था असून सीसीटीव्ही फुटेज हा महत्वाचा पुरावा असतो. उद्या डान्सबार्समध्ये काही घडले तर चौकशीला या सीसीटीव्ही फुटेजची मदत होणार आहे. त्यामुळे बार्समधील प्रत्यक्ष नृत्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड. नाफडे म्हणाले. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ वकील जयंत भूषण यांनी बाजू मांडली. (वृत्तसंस्था)दिलेल्या निर्देशांनुसारच व्यवसायन्या. दीपक मिश्र आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने नव्या कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच राज्य सरकारने परवानगी दिलेल्या तीन डान्सबार्सना जुने नियम आणि त्याने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार व्यवसाय करण्यास या खंडपीठाने परवानगी दिली.