शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर भर नव्या आयुक्तांचा प्राधान्यक्रम : २२ वर्षांचा अनुभवही कमी पडला- कापडणीस

By admin | Updated: June 17, 2016 23:08 IST

जळगाव : महापालिकेची स्थिती बिकट आहे. दुसर्‍या बाजूला विविध संस्थांचे कर्ज नियमीतपणे भरायचे आहे. ही बिकट स्थिती सुधारून पालिकेची स्थिती भक्कम करण्यासाठी वसुलीवर भर देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.

जळगाव : महापालिकेची स्थिती बिकट आहे. दुसर्‍या बाजूला विविध संस्थांचे कर्ज नियमीतपणे भरायचे आहे. ही बिकट स्थिती सुधारून पालिकेची स्थिती भक्कम करण्यासाठी वसुलीवर भर देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
बोर्डे यांनी शुक्रवारी सायंकाळी पालिकेची सूत्रे हाती घेतली. मावळते आयुक्त संजय कापडणीस या वेळी उपस्थित होते. यानिमित्त बोर्डे यांचे स्वागत व कापडणीस यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रमही सभागृहात झाला.

अभ्यास करून अधिक बोलता येईल
पालिकेची स्थिती बिकट असल्याने प्राधान्यक्रम कुठला हा मुद्दा स्पष्ट करता येणार नाही. परंतु आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह इतर अडचणी दूर करू. त्यासाठी अभ्यास केला जाईल, असे बोर्डे म्हणाले.

स्वच्छता, वृक्षारोपणाला महत्त्व
पालिकेची स्थिती सुधारण्यासोबत आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण याबाबतही काम करू. वृक्षारोपण केले जाईल, असेही बोर्डे यांनी सांगितले.

सर्वांचे सहकार्य हवे
पालिकेत काम करताना, प्रकल्प पूर्ण करताना सर्वांच्या सहकार्याची गरज असेल. त्यात पदाधिकार्‍यांची महत्त्वाची साथही हवी असेल, असेही बोर्डे यांनी स्पष्ट केले.

जुन्या आयुक्तांचे प्रकल्प पूर्ण करू
जुन्या आयुक्तांनी जे प्रकल्प हाती घेतले होते, ते पूर्ण केले जातील. त्याबाबतचे काम थांबविले जाणार नाही, असेही बोर्डे यांनी स्पष्ट केले.

२२ वर्षांचा अनुभवही कमी पडला
निरोप समारंभात सत्काराला उत्तर देताना जुने आयुक्त कापडणीस म्हणाले, पालिकेत वाद झाले असतील, पण प्रत्येकाने शहर विकासासाठी आपली भूमिका मांडली. कुठलेही वाद वैयक्तिक नव्हते. कधी दुजाभाव करून काम केले नाही, कारवाई केली नाही. परंतु या महापालिकेतील कामाची पद्धत वेगळीच होती, शैली वेगळी होती. त्यामुळे माझा २२ वर्षांचा प्रशासनातील कामाचा अनुभवही कमी पडला. पालिकेची नाजूक आर्थिक स्थिती, वेतन असे अनेक प्रश्न आहेत. परंतु नवे आयुक्त बोर्डे हे नगरपालिकेचा अनुभव घेऊन आले आहे. ते निश्चितच चांगले काम करतील, त्यांचा अनुभव येथे कामी येईल, असेही कापडणीस म्हणाले.


पाणी वितरण व्यवस्था चांगली नव्हती
शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था चांगली नव्हती. गाळे, आरोग्य, स्वच्छता, कर्ज असेे अनेक प्रश्न होते. परंतु कर्मचार्‍यांनी सामूहिक प्रयत्न करून त्यावर काम केले. कुठली तक्रार येऊ दिली नाही, असेही कापडणीस म्हणाले.